प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाचे झाले लग्न, बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी लावली हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 15:15 IST2021-02-05T15:13:46+5:302021-02-05T15:15:33+5:30

प्रसिद्ध निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शजासोबत प्रियांकने कोर्ट मॅरेज केले. प्रियांक हा प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा आहे.

Padmini Kolhapure's son Priyaank Sharma Marries Karim Morani's Daughter Shaza | प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाचे झाले लग्न, बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी लावली हजेरी

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाचे झाले लग्न, बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी लावली हजेरी

ठळक मुद्देअभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरीने एक काळ गाजवला आहे. तिने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. तिचा मुलगा प्रियांक शर्माचे नुकतेच लग्न झाले. प्रसिद्ध निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शजासोबत प्रियांकने कोर्ट मॅरेज केले.

अभिनेता वरूण धवन आणि त्याच्या बालपणीची मैत्रीण नताशा दलालच्या लग्नानंतर आता आणखीन एक अभिनेता लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याने अतिशय साधेपणाने लग्न केले. केवळ त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी शानदार पार्टी दिली.

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरीने एक काळ गाजवला आहे. तिने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. तिचा मुलगा प्रियांक शर्माचे नुकतेच लग्न झाले. प्रसिद्ध निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शजासोबत प्रियांकने कोर्ट मॅरेज केले आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्रमैत्रिणींसाठी एका रिसेप्शनचे आयोजन केले होते. या रिसेप्शनला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. 

प्रियांकच्या रिसेप्शनला त्याची मावस बहीण श्रद्धा कपूरने हजेरी लावली होती. श्रद्धा रिसेप्शनला भारतीय पेहरावात दिसली. तिच्यासोबत तिचे कुटुंबिय देखील होते. तसेच या रिसेप्शनला अनिल कपूर, बोनी कपूर, सनी देओल, भाग्यश्री, जुही चावला यांनी देखील हजेरी लावली होती. प्रियांकने रिसेप्शनला पांढरा सदरा आणि त्याला साजेसा पिवळा कोर्ट घातला होता तर शजा गोल्डन रंगाच्या साडीत दिसली. ते दोघेही खूपच छान दिसत होते. त्यांनी मीडियाला पाहाताच सुंदर पोजेस देखील दिल्या.

प्रियांकने नुकताच बॉलिवूड डेब्यू केला होता. ‘सब कुशल मंगल’ या सिनेमात तो दिसला होता. शजाबद्दल सांगायचे तर ती असिस्टंट डायरेक्टर आहे. ऑलवेज कभी कभी, हॅपी न्यू इअर यांसारख्या सिनेमासाठी तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. यावर्षी सुरुवातीला शजा, तिची बहीण जोआ आणि वडील करीम मोरानी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना अनेक दिवस रूग्णालयात राहावे लागले होते.

Web Title: Padmini Kolhapure's son Priyaank Sharma Marries Karim Morani's Daughter Shaza