पद्मिनी कोल्हापुरेचा ‘तो’ रेप सीन बघण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांनी लावल्या होत्या रांगा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 14:16 IST2017-11-01T08:46:39+5:302017-11-01T14:16:39+5:30
आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये वर्चस्व गाजविणाºया अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे हिने वयाच्या पंधराव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यातच तिने एक रेप सीन देऊन इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली होती.
.jpeg)
पद्मिनी कोल्हापुरेचा ‘तो’ रेप सीन बघण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांनी लावल्या होत्या रांगा !
व ाच्या पंधराव्या वर्षी अभिनय आणि गायकी जगतात पाऊल ठेवणारी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आज तिचा ५२ वा वाढदिवस साजरा करीत आहे. पद्मिनीने इंडस्ट्रीत बालकलाकार म्हणून पाऊल ठेवले होते. तिने ‘यादों की बारात’ चित्रपटात कोरसमध्ये (ग्रुप) गीत गायिले होते. पद्मिनीचा जन्म १ नोव्हेंबर १९६५ मध्ये झाला. जेव्हा तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले तेव्हा तिचा चेहरा खूपच नाजूक होता. त्यामुळे दिग्दर्शकांनी तिला बालकलाकार म्हणून संधी दिली. खरं तर लहानपणापासूनच पद्मिनीने बोल्ड आणि संवेदनशील भूमिका साकारल्या. पद्मिनीने राज कपूर यांच्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ (१९७८) या चित्रपटात झीनत अमानच्या लहानपणीची भूमिका साकारली होती.
त्यावेळी हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्याचबरोबर पद्मिनीचा चित्रपटातील अंदाज प्रेक्षकांना त्याकाळी प्रचंड भावला होता. तसेच तिच्या फिल्मी करिअरलाही या चित्रपटाने एक ट्रॅक निर्माण करून दिला होता. त्याचीच प्रचिती म्हणून वयाच्या पंधराव्या वर्षी तिला बी. आर. चोपडा यांच्या ‘इन्साफ का तराजू’ या चित्रपटात झिनतच्या लहान बहिणीची भूमिका करण्याची संधी मिळाली. पद्मिनीने चित्रपटात रेप सीन देऊन खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटात झीनत अमान आणि राज बब्बर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटात पद्मिनीने दिलेला रेप सीन फारच लांबलचक असल्याने त्याकाळी ती वादाच्या भोवºयातही सापडली होती.
प्रचंड वाद निर्माण झाला असतानाही चित्रपटात हा सीन दाखविण्यात आला. त्यामुळे केवळ हा सीन बघण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटागृहाबाहेर अक्षरश: रांगा लावल्या होत्या. चित्रपटाचा विषय गंभीर असल्याने प्रेक्षकांना पद्मिनीचा अंदाज खूपच भावला होता. त्यावेळी पद्मिनीचे सर्वत्र कौतुकही केले गेले. पुढे वयाच्या १७ व्या वर्षी राज कपूर यांच्या ‘प्रेमरोग’मध्ये (१९८२) पद्मिनी मुख्य भूमिकेत झळकली. चित्रपटाचा विषय आणि राज कपूर यांनी दिलेला टच यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्याचबरोबर पद्मिनीच्या करिअरलाही जबरदस्त ब्रेक मिळाला.