​ लोकमत सखी मंचच्या सदस्यांपुढे अवतरला ‘पॅडमॅन’ अक्षय कुमार ! म्हणाला, पुरूषांपेक्षा महिलाच जिगरबाज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 16:02 IST2018-01-15T10:04:04+5:302018-01-15T16:02:37+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने आज सोमवारी  पुण्यात आयोजित सोहळ्यात लोकमत सखी मंचच्या हजारो सदस्यांशी मनमोकळा संवाद साधत एका ...

Padmayan Akshay Kumar for Avatar of Lokmat Sakhi Forum Said, women are more than men. | ​ लोकमत सखी मंचच्या सदस्यांपुढे अवतरला ‘पॅडमॅन’ अक्षय कुमार ! म्हणाला, पुरूषांपेक्षा महिलाच जिगरबाज!!

​ लोकमत सखी मंचच्या सदस्यांपुढे अवतरला ‘पॅडमॅन’ अक्षय कुमार ! म्हणाला, पुरूषांपेक्षा महिलाच जिगरबाज!!

लिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने आज सोमवारी  पुण्यात आयोजित सोहळ्यात लोकमत सखी मंचच्या हजारो सदस्यांशी मनमोकळा संवाद साधत एका वेगळ्या विषयावर उपस्थितांचे प्रबोधन केले. या प्रबोधनामागची पार्श्वभूमी होती अक्षयचा आगामी चित्रपट ‘पॅडमॅन’. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षयने  महिला शक्तीबद्दल गौरवोद्गार काढले. महिला या पुरूषांपेक्षा कित्येकपट अधिक जिगरबाज असतात, असे अक्षय म्हणाला. केवळ म्हणालाच नाही तर यासाठी त्याने कॅनडातील एक उदाहरणही यावेळी दिले.

त्याने सांगितले की, कॅनडात एका विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करायचे होते. अटीतटीची वेळ होती. विमानातील सगळे प्रवासी प्रचंड घाबरले होते. पायलटला समुद्राच्या पाण्यावर लँडिंग करायचे होते आणि हे करताना थोडीही चूक सगळ्यांच्या जीवावर बेतणारी होती. पायलटचे गेसिंग किंचित जरी चुकले तरी अख्खे विमान कॅ्रश होण्याचा धोका होता. अशा अटीतटीच्यावेळी पायलटने आपल्यातील सगळे कौशल्य पणाला लावून विमानाचे पाण्यावर लँडिंग केले आणि सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या सुखरूप लँडिंगनंतर विमानाचा दरवाजा उडण्यात आला तेव्हा मूत्राचा जोरदार दर्प सगळीकडे पसरला. होय, त्या विमानातील ६० टक्के पुरूषांची घाबरून पॅन्ट ओली झाली होती. याऊलट विमानातील सगळ्या महिला त्या लँडींगच्या आणीबाणीच्या क्षणाला धीराने आणि धैर्याने सामोºया गेल्या होत्या, असे अक्षयने सांगितले. मी सांगतलेली ही कथा कल्पनेतील कथा नाही तर सत्य घटना आहे. त्यामुळेच महिला या पुरूषांपेक्षा सुप्रीम आहेत, असे मी मानतो, असे अक्षय यावेळी म्हणाला.
  पुणे येथील ईशान्य शॉपिंग मॉलजवळील, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथे असलेल्या गेनबा सोपानराव मोझे प्रशाला येथे सखी मंचचा हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित सखी मंच सदस्यांच्या प्रश्नांनाही अक्षयने मनमोकळी उत्तरे दिलीत. 

Web Title: Padmayan Akshay Kumar for Avatar of Lokmat Sakhi Forum Said, women are more than men.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.