Padmavati First Look: सुल्तान अलाऊद्दीन खिल्जीचा ‘लूक’ आला ! सोशल मीडियावर रणवीर सिंग ‘हिट’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 12:19 IST2017-10-03T04:34:28+5:302017-10-03T12:19:49+5:30

संजय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’मधील दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर यांचा लूक लोकांना प्रचंड भावला. यानंतर चाहत्यांना प्रतीक्षा ...

Padmavati First Look: Sultan Alauddin Khilji's 'Look'! Ranvir Singh 'hits' on social media !! | Padmavati First Look: सुल्तान अलाऊद्दीन खिल्जीचा ‘लूक’ आला ! सोशल मीडियावर रणवीर सिंग ‘हिट’!!

Padmavati First Look: सुल्तान अलाऊद्दीन खिल्जीचा ‘लूक’ आला ! सोशल मीडियावर रणवीर सिंग ‘हिट’!!

जय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’मधील दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर यांचा लूक लोकांना प्रचंड भावला. यानंतर चाहत्यांना प्रतीक्षा होती ती या चित्रपटात अल्लाऊद्दीन खिल्जीची भूमिका साकारणा-या रणवीर सिंगच्या लूकची. तर ती प्रतीक्षाही संपलीय. होय, रणवीर सिंगचा लूक आज जारी करण्यात आला. ‘कल सुबह आएंगे सुल्तान अलाऊद्दीन खिल्जी’, असे tweet रणवीरने काल (२ आॅक्टोबर) केले आणि आज(३ आॅक्टोबर) पहाटे अलाऊद्दीन खिल्जीचे लूक जारी करण्यात आले.



या चित्रपटात रणवीर सिंग निगेटीव्ह शेड्समध्ये दिसणार असला तरी त्याचे हे लूक लोकांना मनापासून भावले आहे. व्यक्तिरेखेनुसार, रणवीर यात काहीसा भयावह दिसतोय. केवळ दाढीचं नाही तर त्याचे केसही वाढलेले आहेत. चेह-यावर मोठ्या जखमेचा एक व्रण आहे. अर्थात तरिही रणवीरचे हे लूक प्रचंड प्रभावित करणारे आहे. सोशल मीडियावर त्याचे हे लूक प्रचंड हिट झाले आहे.



ALSO READ : राणी ‘पद्मावती’ बनलेल्या दीपिका पादुकोनच्या अंगावरील दागिन्यांचे वजन किती असेल? वाचून तुम्हाला धक्का बसेल!

रणवीर सिंग केवळ अभिनय करत नाही तर व्यक्तिरेखेत अक्षरश: जीव ओततो. खिल्जीच्या व्यक्तिरेखेत रणवीर असा काही शिरला की, त्याची चालण्या-बोलण्याची ढबही बदलली. त्याच्या जवळच्या मित्रांचे मानाल तर, रणवीरच्या वागण्या-बोलण्यात खिल्जीचा प्रभाव अलीकडे जाणवू लागला आहे. तो हसणे-बोलणेही विसरला आहे. या भूमिकेत शिरण्यासाठी रणवीरने अनेक दिवस स्वत:ला घरात कोंडून घेतले. कुणीही भेटू नये आणि वागण्यात अधिकाधिक गांभीर्य यावे, हा त्याचा उद्देश होता. ‘पद्मावती’च्या सेटवरही लोकांशी बोलायचे तो टाळायचा. ‘फर्स्ट पोस्ट’ने दिलेल्या माहितीनुसार, रणवीरची ही स्थिती बघून त्याच्या जवळच्या मित्रांनी त्याला मानसोपचार तज्ज्ञांना भेटायचा सल्ला दिलाय. विशेष म्हणजे, मित्रांचा हा सल्ला मानून रणवीर मानसोपचार तज्ज्ञांना भेटण्याच्या विचारात आहे.
‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटावेळीही रणवीर काहीशा अशाच स्थितीतून गेला होता. या चित्रपटात त्याला आजारी पडल्याचा अभिनय करायचा होता. हा सीन करण्यासाठी रणवीरने असे काही केले की, ज्यामुळे तो खरोखरच आजारी पडला होता. त्यानंतर त्याने हा सीन पूर्ण केला होता.  

Web Title: Padmavati First Look: Sultan Alauddin Khilji's 'Look'! Ranvir Singh 'hits' on social media !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.