​पंधरा दिवसानंतर दीपिका थांबवणार ‘पद्मावती’चे शूटींग? पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 17:14 IST2016-12-01T17:14:55+5:302016-12-01T17:14:55+5:30

आणखी १५ दिवसानंतर  दीपिका पादुकोण  ‘पद्मावती’चे शूटींग थांबवणार आहे. होय, पंधरा दिवसानंतर दीपिका ‘पद्मावती’चे काम थांबवून एका नव्या कामात ...

'Padmavati' to be stopped after fifteen days to stop Deepika? But why? | ​पंधरा दिवसानंतर दीपिका थांबवणार ‘पद्मावती’चे शूटींग? पण का?

​पंधरा दिवसानंतर दीपिका थांबवणार ‘पद्मावती’चे शूटींग? पण का?

खी १५ दिवसानंतर  दीपिका पादुकोण  ‘पद्मावती’चे शूटींग थांबवणार आहे. होय, पंधरा दिवसानंतर दीपिका ‘पद्मावती’चे काम थांबवून एका नव्या कामात बिझी होणार आहे. खरे तर ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी त्यांच्यासोबत काम करणा-या कलाकारांच्या डेट्सबद्दल अतिशय प्रोफेशन आहेत. प्रोजेक्ट कुठलाही असो, त्यांना कलाकारांकडून एकत्र १२० ते १५० दिवसांच्या डेट्स हव्या असतात. याबद्दल भन्साळी कुठलीही तडजोड स्वीकारण्यात तयार नसतात. आपले काम डिस्टर्ब होऊ नये, हा यामागचा त्यांचा हेतू असतो. पण कदाचित दीपिकाच्याबाबतीत भन्साळींनी तडजोड स्वीकारलेली दिसते. पण का? कारण दीपिकाला तिच्या ‘डेब्यू’ची चिंता सतावते आहे. डेब्यू?? होय... दीपिकाला तिच्या हॉलिवूड डेब्यूची चिंता सतावू लागलीय. त्यामुळे  ‘पद्मावती’चे काम काही दिवस बंद करून दीपिका तिच्या हॉलिवूड डेब्यूवर लक्ष केंद्रीत करणार आहे.

XXX The Return Of The Xander Cage

दीपिकाचा हॉलिवूड स्टार विन डिजेलसोबतचा ‘ XXX The Return Of The Xander Cage’ हा हॉलिवूडपट नव्या वर्षांत प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दीपिका डिसेंबरचे शेवटचे दोन आठवडे फ्री ठेवणार आहे. जेणेकरून तिला तिच्या हॉलिवूडपटाच्या प्रमोशनसाठी पुरेसा वेळ मिळू शकेल. या हॉलिवूडपटाचा प्रीमियरही भारतात होणार आहे. त्यामुळे येत्या १५ डिसेंबरपर्यंत ‘पद्मावती’चे अधिकाधिक काम पूर्ण करण्याचे दीपिकाचे प्रयत्न सुरु आहेत. कारण १५ डिसेंबरनंतर दीपिकाला पूर्ण मोकळा वेळ हवाय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पद्मावती’ साईन करण्याआधीच दीपिकाने भन्साळींना याबाबतची कल्पना दिली होती. त्यामुळे दीपिकाला १५ डिसेंबरनंतर सुट्टी मिळणे, फारसे कठीण नाही. शेवटी दीपिका ही भन्साळींची आवडती अभिनेत्री आहे. आता आवडत्या व्यक्तिसाठी भन्साळी इतकी तडजोड तर करूच शकतात.
 

 

Web Title: 'Padmavati' to be stopped after fifteen days to stop Deepika? But why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.