पलट...पलट...! ‘चोरी’चा निघाला ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’चा ‘तो’ सीन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 14:05 IST2018-02-08T08:35:20+5:302018-02-08T14:05:20+5:30

भारतात सर्वाधिक काळ चित्रपटगृहात झळकलेला चित्रपट हा विक्रम आपल्या नावे करणारा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा सिनेमा आठवताच मूड रोमॅन्टिक होतं. आता आम्हाला हा सिनेमा आठवण्याचे कारण काय, तर या चित्रपटाबद्दल अचानक झालेला खुलासा.

Overturn ... overturning ...! 'Theft' will be 'Dilwale Dulhaniya Le Jayenge''s 'Soon' scene !! | पलट...पलट...! ‘चोरी’चा निघाला ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’चा ‘तो’ सीन!!

पलट...पलट...! ‘चोरी’चा निघाला ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’चा ‘तो’ सीन!!

रतात सर्वाधिक काळ चित्रपटगृहात झळकलेला चित्रपट हा विक्रम आपल्या नावे करणारा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा सिनेमा आठवताच मूड रोमॅन्टिक होतं. आता आम्हाला हा सिनेमा आठवण्याचे कारण काय, तर या चित्रपटाबद्दल अचानक झालेला खुलासा. होय, उण्यापु-या २२ वर्षांनंतर या चित्रपटाबद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे. यातील सर्वाधिक यादगार असा एक सीन ‘चोरी’चा होता, असे समोर आले आहे. खुद्द ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’चा दिग्दर्शक आदित्य चोप्रा याने ही कबुली दिली आहे. 



राज अर्थात शाहरूख खान आणि सिमरन म्हणजेच काजोल यांच्यावर चित्रीत करण्यात आलेला हा सीन कुणीच विसरणे शक्य नाही. स्वत:पासून दूर जात असलेल्या सिमरनने एकदा तरी पलटून बघावे, याची आस लावून बसलेला राज ‘पलट...पलट...’ म्हणतो आणि खरचं काही अंतरावर गेल्यावर सिमरन राजकडून पलटून पाहते, असा हा सीन होता. हा सीन प्रचंड गाजला होता. पण हा सीन एका हॉलिवूड चित्रपटातील सीनची जशीच्या तशी कॉपी होता, असे आता समोर आले आहे.



१९९३ मध्ये आलेल्या क्लिंट इस्टवूडचा ‘इन द लाइन आॅफ फायर’ या हॉलिवूड चित्रपटातून तो उचलला गेला होता. या चित्रपटानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९९५ मध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ रिलीज झाला होता.  आमच्यावर विश्वास बसत नसेल तर सोबत दिलेला व्हिडिओ तुम्ही एकदा बघायलाच हवा.
लेखिका आणि दिग्दर्शक नसरीन मुन्नी कबीर यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात आदित्य चोप्रा याने ‘पलट’ हा सीन हॉलिवूड चित्रपटातून उचलण्यात आल्याचे मान्य केले आहे. ‘इन द लाइन आॅफ फायर’ पाहिल्यानंतर त्यातील तो सीन माझ्या मेंदूत रूतून बसला होता. पण काही दिवसांनी मी तो विसरलो. यानंतर ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ची स्क्रिप्ट लिहित असताना मला तो सीन पुन्हा आठवला आणि मी तो सीन लगेच माझ्या स्क्रिप्टमध्ये घेतला, अशी कबुली आदित्यने दिल्याचे या पुस्तकात नमूद आहे.

Web Title: Overturn ... overturning ...! 'Theft' will be 'Dilwale Dulhaniya Le Jayenge''s 'Soon' scene !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.