आमच्यातील प्रेम अजूनही जिवंत-युलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2016 17:43 IST2016-11-20T17:43:15+5:302016-11-20T17:43:15+5:30

‘दबंग स्टार’ सलमान खान आणि रोमानियन ब्युटी युलिया वेंटर यांच्यातील प्रेमसंबंध संपले म्हणून त्यांचे चाहते गेल्या काही दिवसांपासून नाराज ...

Our love is still alive - Yulia | आमच्यातील प्रेम अजूनही जिवंत-युलिया

आमच्यातील प्रेम अजूनही जिवंत-युलिया

बंग स्टार’ सलमान खान आणि रोमानियन ब्युटी युलिया वेंटर यांच्यातील प्रेमसंबंध संपले म्हणून त्यांचे चाहते गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. पण, चाहत्यांनी बिल्कुल नाराज व्हायची गरज नाहीये. कारण, नुकतेच युलियाने केलेल्या एका वक्तव्यावरून वाटते की, त्यांच्यातील प्रेम आजही टिकून आहे. ती म्हणते,‘मी आणि सलमान खान यांच्यातील प्रेम संपलेले नाहीये. आम्ही आजही एकमेकांच्या प्रेमात आहोत.’ त्यामुळे ती चाहत्यांना सांगू इच्छिते की,‘चाहत्यांनो, तुम्ही नाराज होऊ नका.’

एका मुलाखतीदरम्यान बोलताना ती म्हणते,‘सलमानकडे अनेक बॉडीगार्ड्स आहेत पण मला रोमानियात सुरक्षित वाटतं. येथे मला बॉडीगार्ड्सची गरज वाटत नाही. भारतात चाहते तुमच्यावर प्रेम करतात पण, एक सेलिब्रिटी म्हणून तुम्हाला रस्त्यावर फिरता येत नाही. मॉल, चर्चमध्ये जाता येत नाही. रोमानियात मी जशी असते तसेच राहायला मला जास्त आवडतं.’ 

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि रोमानियन स्टार युलिया वेंटर यांच्यात काही दिवसांपूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांनंतर त्यांचा ब्रेकअप झाला आणि युलिया रोमानियाला निघून गेली. पण, हे बरं झालं की, ते आजही एकमेकांवर तेवढंच प्रेम करतात. 

Web Title: Our love is still alive - Yulia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.