​Oscars 2018 : ऑस्करमध्ये शशी कपूर आणि श्रीदेवी यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 04:52 AM2018-03-05T04:52:55+5:302018-03-05T10:24:17+5:30

शशी कपूर आणि श्रीदेवी या बॉलिवूडमधील कलाकारांना यंदाच्या ऑस्करमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. ऑस्कर या पुरस्कार सोहळ्याची वाट हॉलिवूड, बॉलिवूडमधील ...

Oscars 2018: Oscar tribute to Shashi Kapoor and Sridevi | ​Oscars 2018 : ऑस्करमध्ये शशी कपूर आणि श्रीदेवी यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

​Oscars 2018 : ऑस्करमध्ये शशी कपूर आणि श्रीदेवी यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

googlenewsNext
ी कपूर आणि श्रीदेवी या बॉलिवूडमधील कलाकारांना यंदाच्या ऑस्करमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. ऑस्कर या पुरस्कार सोहळ्याची वाट हॉलिवूड, बॉलिवूडमधील सेलिब्रेटी वर्षभर पाहात असतात. सगळ्या पुरस्कार सोहळ्यातमध्ये ऑस्करला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. या ऑस्कर सोहळ्यात बॉलिवूडमधील या दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रीदेवी आणि शशी कपूर यांनी मोठे योगदान बॉलिवूडला दिले आहेत. शशी कपूर यांनी तर हिंदीसोबत इंग्रजी सिनेमात देखील काम केले. द हाऊसहोल्डर, शेक्सपिअरवाला, बॉम्बे टॉकी, हिट एंड डस्ट असे त्यांचे इंग्रजी सिनेमे भारतातच नाहीतर परदेशातही गाजले. शशी कपूर यांचे ४ डिसेंबर २०१७ ला कोकिळाबेन रुग्णालयात निधन झाले. शशी कपूर यांना २०१४ मध्ये फुप्फुसामध्ये जंतू संसर्ग झाला होता. त्याआधी त्यांची बायपास सर्जरी देखील करण्यात आली होती. या सर्जरीनंतर त्यांची तब्येत खालावतच गेली. शशी कपूर यांच्या अंतिम दर्शनासाठी बॉलिवूडमधील मंडळींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. 
श्रीदेवी यांचे २४ फेब्रुवारी २०१८ ला निधन झाले. त्यावेळी त्या ५४ वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत त्या एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना त्यांचे निधन झाले. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. त्यावेळी एअरपोर्टवर अनिल अंबानी, जावेद अख्तर, शबाना आझमी, अनिल कपूर यांसारखे सेलिब्रिटी उपस्थित होते. त्याचसोबत त्यांच्या फॅन्सनी देखील एअरपोर्टच्या बाहेर प्रचंड गर्दी केली होती. श्रीदेवी यांचे पार्थिव अंधेरी येथील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंत्ययात्रेला देशभरातून त्यांचे चाहते आले होते. आपल्या लाडक्या अभिनेत्रीला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो चाहते जमले आहेत. 
शशी कपूर आणि श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानासाठी त्यांना ऑस्करकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. 

Also Read : Oscar 2018 : आॅस्करमध्ये पुन्हा दुमदुमणार ‘जय हो’, रहमानने शेअर केला फोटो!

Web Title: Oscars 2018: Oscar tribute to Shashi Kapoor and Sridevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.