​केवळ सलमान खानमुळे ‘न्यूयॉर्क’मध्ये दिसली कॅटरिना कैफ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 15:14 IST2017-06-06T09:44:41+5:302017-06-06T15:14:41+5:30

सलमान खान नसता तर कदाचित कॅटरिना कैफ ‘न्यूयॉर्क’ या चित्रपटात नसती. ऐकून तुम्हाला थोडे आश्चर्यच वाटेल. कारण सलमान या ...

Only Katrina Kaif appeared in Salman Khan's 'New York' | ​केवळ सलमान खानमुळे ‘न्यूयॉर्क’मध्ये दिसली कॅटरिना कैफ!

​केवळ सलमान खानमुळे ‘न्यूयॉर्क’मध्ये दिसली कॅटरिना कैफ!

मान खान नसता तर कदाचित कॅटरिना कैफ ‘न्यूयॉर्क’ या चित्रपटात नसती. ऐकून तुम्हाला थोडे आश्चर्यच वाटेल. कारण सलमान या चित्रपटात कुठेही नव्हता. ना कुठल्या सीनमध्ये, ना कुठल्या डान्स नंबरमध्ये. मग या चित्रपटाशी सलमान खानचे कनेक्शन अचानक जुळले कसे? पण सलमानचे या चित्रपटाशी कनेक्शन होते आणि याचमुळे कॅटरिना या चित्रपटात दिसली. केवळ आणि केवळ सलमानमुळेच कॅटरिनाने कबीर खानच्या या चित्रपटाला होकार दिला होता. खुद्द सलमानने हे रहस्य उलगडले आहे. कबीर खान ‘काबुल एक्स्प्रेस’सारखे चित्रपट बनवत होता, तेव्हापासून सलमान कबीरला ओळखतो. कबीरच्या काही शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंट्रीही सलमानने पाहिल्या होत्या. कबीर एक गुणी दिग्दर्शक आहे, हे सलमानला त्यामुळे पटले होते. अशातच कबीर खान ‘न्यूयॉर्क’ची स्क्रिप्ट घेऊन सलमानकडे वाचायला घेऊन गेला होता. सलमानने ही स्क्रिप्ट वाचली आणि त्याला ती आवडलीही. ही स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्याने कॅटरिनाला हा चित्रपट करण्याची गळ घातली. त्यावेळी सलमान आणि कॅटरिना एकमेकांच्या बरेच जवळ होते.



सलमानने एका इव्हेंटमध्ये सांगितले की, त्यावेळी कॅटरिनाला कबीरचे काम फारसे माहित नव्हते. पण मीच कॅटरिनाला कबीरवर विश्वास ठेव, असे सांगितले. हा चित्रपट हिट होईल, असे मी कॅटरिना म्हणालो होतो आणि झालेही तसेच. कॅटरिना या चित्रपटासाठी राजी झाली आणि ‘न्यूयॉर्क’ हा तिच्या करिअरमधील अनेक उत्कृष्ट सिनेमांपैकी एक ठरला. ‘न्यूयॉर्क’च्या सेटवर कबीर व कॅटरिना यांची चांगली मैत्रीही झाली. यानंतर कबीर खानच्या ‘एक था टायगर’मध्ये कॅटरिना व सलमानची जोडीही एकत्र आली. आता लवकरच कॅट व सलमान ‘एक था टायगर’चा सीक्वल ‘टायगर जिंदा है’मध्ये झळकणार आहे.

Web Title: Only Katrina Kaif appeared in Salman Khan's 'New York'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.