डिसेंबर महिन्यावर केवळ आमिर खानचीच छाप! जाणून घ्या का आहे हा महिना त्याच्यासाठी लकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 14:09 IST2016-12-21T13:39:38+5:302016-12-21T14:09:38+5:30

मागच्या पंचवीस वर्षांपासून बॉलीवूडवर खान त्रिकुटाचे राज्य आहे. आमिर, सलमान आणि शाहरुख खान यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. मोठा ...

Only Amir Khan's impression on December! Learn why this month lucky for him! | डिसेंबर महिन्यावर केवळ आमिर खानचीच छाप! जाणून घ्या का आहे हा महिना त्याच्यासाठी लकी!

डिसेंबर महिन्यावर केवळ आमिर खानचीच छाप! जाणून घ्या का आहे हा महिना त्याच्यासाठी लकी!

गच्या पंचवीस वर्षांपासून बॉलीवूडवर खान त्रिकुटाचे राज्य आहे. आमिर, सलमान आणि शाहरुख खान यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. मोठा स्टार म्हटल्यावर त्यांच्या चित्रपटांमध्ये गुंतवणूकही मोठी असते. ती भरून काढण्यासाठी या चित्रपटांना मोठ्या संख्येने प्रेक्षकवर्ग लागतो.

तिघांच्या नावाने तर लोक चित्रपटगृहात येतातच पण सणोत्सवाच्या काळातील सुट्यांचाही फायदा होतो. म्हणून तर हे तीन खान शक्यतो मोठ्या सणांच्या काळात आपले सिनेमे प्रदर्शित करतात. तिघांचे एक वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येकाने आपापले चित्रपट रिलीज करण्यासाठी वर्षातील महत्त्वाचे तीन सण वाटून घेतले आहेत. सलमान ईदला, शाहरुख दिवाळीला तर आमिर ख्रिसमसला चित्रपट रिलीज करतो.

‘तारे जमीन पर’ (२००७), ‘गजिनी’ (२००८), ‘३ इडियटस् (२००९)’, ‘धूम ३’ (२०१३), ‘पीके’ (२०१४) आणि आता ‘दंगल’ (२०१६) अशा प्रकारे मागच्या नऊ वर्षांपासून आमिर त्याचे चित्रपट डिसेंबर महिन्याच्या शेवटी नाताळाच्या मुहूर्तावर रिलीज करतोय. का करत असेल तो असे?

१. सुट्या 

Aamir Khan And Darsheel Safary
तारे जमीन पर : आमिर खान आणि दर्शिल सफारी

पहिले कारण म्हणजे, नाताळाच्या सुट्या. ख्रिसमस दरम्यान शाळा-कॉलेजसला आणि अनेक आॅफिसेसलासुद्धा सुट्या असतात. उन्हाळ्याच्या सुट्यांच्या विरुद्ध ख्रिसमस हॉलीडे पिरीयडमध्ये लोक सहसा प्रवासाला जात नाहीत. कुटुंबातील संपूर्ण सदस्य मिळून चित्रपट पाहण्यासाठी जातात.

एक कुटुंब म्हटले की, सरासरी चार लोक़ म्हणजे एकगठ्ठा तिकिट विक्री होते. हेच तर कारण आहे की ‘तारे जमीन पर’सारखा गंभीर आणि लहान मुलाविषयी असणारा चित्रपट ‘वेलकम’सारख्या कॉमेडीचित्रपटासोबत रिलीज होऊनही प्रचंड चालला.
२. न्यू इयर

Aamir, Madhavan and Sharman
३ इडियटस् : आमिर खान, आर. माधवन आणि शरमन खान

डिसेंबरच्या शेवटी न्यू इयरचे वातावरण तयार झालेले असते. नव्या वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू होते. चालू वर्षाचा शेवट गोड होण्यासाठी अनेक जण चांगला चित्रपट पाहणे पसंत करतात.

आमिर खानची इमेज अर्थपूर्ण सिनेमे तयार करणारा अभिनेता म्हणून जी झाली आहे, त्याचा फायदाही त्याला या फेस्टिव्ह काळात होतो. म्हणून तर ‘३ इडियटस्’सारखा प्रेरणादायी चित्रपट परत परत पाहिला गेला आणि चित्रपट २०० कोटींचा टप्पा पार करणारा पहिला चित्रपट ठरला.
३. मोकळे रान

Aamir in Ghajini
गजिनी : आमिर खान

हिंदी चित्रपट निर्मात्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला चित्रपट रिलीज करण्याची खूप भीती वाटते. हृतिकच्या ‘कहो ना प्यार है’ व्यतिरिक्त जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यात प्रदर्शित झालेल्या एकाही चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर यश मिळवलेले नाही. त्यामुळे आमिरच्या चित्रपटाला जवळपास सलग ३ आठवडे मोकळे मिळतात.

दुसऱ्या कोणत्याच सशक्त चित्रपटाची स्पर्धा नसल्यामुळे प्रेक्षकांनाही त्याच्या सिनेमाशिवाय पर्याय नसतो. शिवाय आमिरच्या चित्रपटासोबत कोणताच निर्माता त्याची फिल्म रिलीज करण्याचा धोका पत्कारत नाही.
४. आमिरचा फॅनबेस

Dangal Aamir Khanदंगल​ : आमिर खान​

आशयघन, तर्कपूर्ण, सामाजिक संदेश, उत्तम अभिनय अशी आमिरच्या चित्रपटांची वैशिष्ट्ये असतात. त्यामुळे आमिरने स्वत:चा असा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे, जो त्याचे चित्रपट आवर्जुन पाहतो.

शिवाय मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून सांगायचे तर ख्रिसमस म्हणजे आमिर असे समीकरण लोकांच्या डोक्यात पक्के झालेले असल्यामुळे जणूकाही सवयीचा भाग म्हणून डिसेंबर महिन्यात त्याचे चित्रपट पाहणे एक परंपराच बनत आहे. ज्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्याचा चित्रपट नसतो तेव्हा काही तरी मिसिंग असल्यासारखे वाटणे यातच आमिरच्या यशाचे गुपित आहे.
५. सेफ झोन

Aamir in Talash
तलाश : आमिर खान

आमिर कितीही मोठा सुपरस्टार असला तरी त्यालासुद्धा मर्यादा आहेत. चित्रपट केवळ कलाकार, कथा, संगीत यामुळे हीट होतो असे नाही. निदान भारतात तरी नाही. एखादी गोष्ट त्या त्या विशिष्ट काळातच करण्याची आपली सवय आहे. म्हणून तर आमिरचा चित्रपट डिसेंबर महिन्यातच आला पाहिजे. त्याशिवाय दुसऱ्या महिन्यात रिलीज झाला तर लोक त्याला स्वीकारतीलच याची शक्यता कमी असते, असा इतिहास आहे.

उदाहरणारर्थ ‘तलाश’ (२०१२) आणि ‘धोबीघाट’ (२०११). ‘तलाश’ नोव्हेंबर महिन्यात तर ‘धोबीघाट’ जानेवारी महिन्यात रिलीज झाला होता. दोन्ही सिनेमे बॉक्स आॅफिसवर दणाणून आपटले. म्हणजे डिसेंबर महिना आमिरचा सेफ झोन आहे.

Web Title: Only Amir Khan's impression on December! Learn why this month lucky for him!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.