Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding: विकी-कतरिनाचं 'रॉयल' लग्न! 125 VIP गेस्ट, 5 स्टार ताज, ओबेरॉयचं बुकिंग अन् 40 महागड्या कारची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 02:50 PM2021-11-14T14:50:48+5:302021-11-14T14:51:42+5:30

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding: बॉलीवूड स्टार कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार कतरिना आणि विकी पुढील महिन्याच्या सुरुवातीला लग्नगाठ बांधणार आहेत.

One hundred twenty five special guests will attend wedding including luxury vehicles for guests | Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding: विकी-कतरिनाचं 'रॉयल' लग्न! 125 VIP गेस्ट, 5 स्टार ताज, ओबेरॉयचं बुकिंग अन् 40 महागड्या कारची व्यवस्था

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding: विकी-कतरिनाचं 'रॉयल' लग्न! 125 VIP गेस्ट, 5 स्टार ताज, ओबेरॉयचं बुकिंग अन् 40 महागड्या कारची व्यवस्था

googlenewsNext

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding: बॉलीवूड स्टार कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार कतरिना आणि विकी पुढील महिन्याच्या सुरुवातीला लग्नगाठ बांधणार आहेत. हॉटेल सिक्स सेंस बरवाडा फोर्टमध्ये कतरिना-विकीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. यासोबतच चौथ माता ट्रस्ट आणि हॉटेल शिवप्रिया पॅलेसमध्ये एकूण ४२ आलिशान खोल्यांचंही पाहुण्यांसाठीचं बुकिंग करण्यात आलं आहे. आता सवाई माधोपूर रणथंबोर रोड स्थित फाइव्हा स्टार ताज आणि ऑबेरॉय हॉटेलमध्येही पाहुण्यांसाठीचं बुकिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

सुत्रांच्या माहितीनुसार, विविध हॉटेल्समध्ये एकूण १२५ VIP पाहुण्यांसाठीचं बुकिंग करण्यात आलं आहे. याशिवाय पाहुणे आणि सेलिब्रिटींनी विमानतळाहून हॉटेलपर्यंत आणण्यासाठी एका ट्रॅव्हल कंपनीसोबत करार करण्यात आला असून त्यासाठी ४० महागड्या कार बुक करण्यात आल्या आहेत. यात ऑडी, रेंज रोव्हरसह वॅनिटी व्हॅन्सचाही समावेश आहे. 

इव्हेंट कंपन्यांकडून हॉटेल्सची चाचपणी
हॉटेल रिजेंटा वन्य महलचे मॅनेजर शुआउद्दीन खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगल सफारी बुकिंगसाठी एका इव्हेंट टीमसोबत बोलणी सुरू आहे. येत्या एक ते दोन दिवसात करार पूर्णत्वास जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. रणथंबोरमध्ये कमी बजेटवाले हॉटेल्स टायगर सफारी आणि लग्नाच्या सीझनमुळे याआधीच बुकिंग झालेले आहेत. त्यामुळे इव्हेंट कंपन्यांना खूप शोधाशोध करावी लागत आहे. 

Web Title: One hundred twenty five special guests will attend wedding including luxury vehicles for guests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.