एक देश, एक कुटुंबासाठी कार्य करा- नाना पाटेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 13:00 IST2016-08-14T07:30:51+5:302016-08-14T13:00:51+5:30
‘आम्ही जे कार्य करतो, ज्या परिस्थितीत करतो ती इतकी मोठी किंवा आदर्श नाहीत. परंतु, शेतकरी ज्या परिस्थितीत गाव जगविण्याचे ...

एक देश, एक कुटुंबासाठी कार्य करा- नाना पाटेकर
महर्षी व्यास सभागृहात लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था, विदर्भ एकलव्य एकल विद्यालय शिक्षक पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमात पाटेकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्याचे काम म्हणजे गीता आहे. ती कृष्णाने दिलेली नसून त्यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे, परिणामाची भीती सोडून अव्याहत कार्य करावे. शिवाय, कार्य उपकारासाठी नव्हे तर स्वत:च्या समाधानासाठी करावे, असेही प्रतिपादन पाटेकर यांनी केले.
एका जिल्ह्यातील तब्बल २२० शेतकऱ्याच्या विधवांना बघितल्यावर मन कासाविस झाले. अगदी १८ ते ३० वयोगटातील सर्व मुली होत्या. डोक्यावरचे छत हरपले, कडेवर चिमुकले बाळ, चेहऱ्यावरील निरागसपणा पाहिला. याच झुंबडात माझी मुलगी मदतीच्या आशेने फिरत असती तर, या विचाराने मन थिजले. यातूनच नाम फाऊंडेशनची सुरुवात झाली. माझा समाज, धर्म, देश यापेक्षा पुढे सरकून मी भारतीय असल्याची भावना रुजली पाहिजे. मारण्यापेक्षा जगवायला शिकले पाहिजे, असे आवाहन पाटेकर यांनी यावेळी केले.