१९ वर्षांनंतर पुन्हा परततोय 'ओमकारा'चा लंगडा त्यागी; लवकरच होणार शूटिंगला सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 16:00 IST2025-09-30T15:59:35+5:302025-09-30T16:00:52+5:30
'ओमकारा' (Omkara Movie) चित्रपटातील सैफ अली खान(Saif Ali Khan)चे 'लंगडा त्यागी' हे पात्र अत्यंत गाजले. २००६ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटातील 'लंगडा त्यागी' हे पात्र आजही चाहत्यांच्या आवडीचे आहे. आता १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा 'लंगडा त्यागी' परत येत आहे.

१९ वर्षांनंतर पुन्हा परततोय 'ओमकारा'चा लंगडा त्यागी; लवकरच होणार शूटिंगला सुरूवात
'ओमकारा' (Omkara Movie) चित्रपटातील सैफ अली खान(Saif Ali Khan)चे 'लंगडा त्यागी' हे पात्र अत्यंत गाजले. २००६ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटातील 'लंगडा त्यागी' हे पात्र आजही चाहत्यांच्या आवडीचे आहे. आता १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा 'लंगडा त्यागी' परत येत आहे. निर्माते हे पात्र पुन्हा जिवंत करण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत या भूमिकेत पुन्हा सैफच दिसणार का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
'लंगडा त्यागी'वर आधारीत सिनेमा बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. याच्या स्क्रीप्टवर काम सुरू असून, लवकरच शूटिंगही सुरू होण्याची शक्यता आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, कुमार मंगत आणि अभिषेक पाठक हे 'ओमकारा' मधील 'लंगडा त्यागी'च्या पात्रावर आधारित एक स्पिन-ऑफ बनवत आहेत. मीडिया रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने लिहिले की, 'सैफ अली खानने साकारलेले 'लंगडा त्यागी'चे पात्र वेळेच्या कसोटीवर खरे उतरले आहे आणि दर काही महिन्यांनी पॉप-कल्चरमध्ये त्याचा उल्लेख होत असतो. १९ वर्षांनंतर, प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाच्या आधारावर, निर्माते कुमार मंगत आणि अभिषेक पाठक 'लंगडा त्यागी'चा स्पिन-ऑफ बनवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. दोघांच्या मनात एक अशी कल्पना आली, जी आपोआप 'ओमकारा'च्या आणि त्याहून अधिक 'लंगडा त्यागी'च्या जगाकडे घेऊन जाते.'
'लंगडा त्यागी'च्या भूमिकेत पुन्हा दिसणार सैफ?
'लंगडा त्यागी'च्या स्पिन-ऑफचे शूटिंग २०२६ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या याच्या स्टारकास्टबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सैफ अली खानच्या पुनरागमनाबद्दल रिपोर्टमध्ये लिहिले की, ''हे एक रहस्य आहे, जे स्क्रीप्ट निश्चित झाल्यावरच उघडेल. सैफ अली खान 'ओमकारा'च्या जगात पुन्हा परत येऊ शकतो, किंवा निर्माते या भूमिकेसाठी एखाद्या तरुण कलाकाराचीही निवड करू शकतात, ज्यामुळे हा खऱ्या अर्थाने एक रिबूट बनेल.'