OMG : दंगलचा दिग्दर्शक नितेश तिवारीचा चित्रपट करण्यास वरुण धवनने दिला नकार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 10:03 AM2017-07-31T10:03:01+5:302017-07-31T15:40:51+5:30

आमिर खानच्या दंगलचे दिग्दर्शन केल्यानंतर नितेश तिवारी आपल्या पुढच्या चित्रपटाची वाट बघतो होता. आता त्याची ही प्रतीक्षा संपली आहे. ...

OMG: Varun Dhawan did not give the film's director Nitesh Tiwari for the film? | OMG : दंगलचा दिग्दर्शक नितेश तिवारीचा चित्रपट करण्यास वरुण धवनने दिला नकार ?

OMG : दंगलचा दिग्दर्शक नितेश तिवारीचा चित्रपट करण्यास वरुण धवनने दिला नकार ?

googlenewsNext
िर खानच्या दंगलचे दिग्दर्शन केल्यानंतर नितेश तिवारी आपल्या पुढच्या चित्रपटाची वाट बघतो होता. आता त्याची ही प्रतीक्षा संपली आहे. त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या तयारीला तो लागला आहे मात्र त्याच्या आगामी चित्रपटातील हिरो मिळाणे कठिण जातेय. काही दिवसांआधी नितेश तिवारीच्या चित्रपटात वरुण धवन झळकणार अशी चर्चा होती मात्र आता असे कळते की वरुणने या भूमिकेसाठी नकार दिला आहे.
 
मिड-डेच्या रिपोर्टनुसार वरुणकडे सध्या डेट नसल्याने त्यांने या चित्रपटासाठी नकार दिला आहे. नुकताच वरुणने जुडवा2' ची शूटिंग पूर्ण केली आहे. यानंतर तो ऑक्टोबरमध्ये शूजित सरकारच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत नितेश म्हणाला, ''आम्ही या चित्रपटासाठी वरुण धवनला विचारेल होतो मात्र सध्या तो चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी आम्हाला नवा चेहरा शोधयला लागणार आहे. ज्याचा स्क्रिन प्रेजेंस चागला असेल. तो या चित्रपटाला घेऊन खूप खूश होता मात्र त्याच्या बिझी शेड्यूलमुळे तो या चित्रपटाला वेळ देईल की नाही ते मला नाही माहिती.'' या चित्रपटाची कथा खूप इंटस्टेटिंग आहे वरुण या भूमिकेसाठी परफेक्ट आहे. या चित्रपटाची कथा एक अशा मुलाची आहे ज्याला बिझनेसमॅन बनायचे असते आणि त्याच्याकडे बिझनेसच्या वेगवेगळ्या खूप आयडिया देखील असतात मात्र त्याच्या आईची मौत्रिणी त्या चोराण्याचा प्रयत्न करते.
 
ALSO READ  : वरुन धवन, जॅकलिन फर्नांडिस, तापसी पन्नूने पूर्ण केली 'जुडवा 2' ची शूटिंग

गेल्या काही दिवसांपासून वरुण धवन वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. नुकताच वरुणवने 'जुडवा 2' च्या टीमसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. 

Web Title: OMG: Varun Dhawan did not give the film's director Nitesh Tiwari for the film?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.