OMG : सलमान खानच्या ‘दबंग-३’ची कथा झाली लिक, वाचा सविस्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2017 18:56 IST2017-06-29T13:26:21+5:302017-06-29T18:56:39+5:30

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याचा नुकताच रिलीज झालेला ‘ट्यूबलाइट’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर भलेही अपेक्षेपेक्षा अधिक कमाई करू शकला ...

OMG: The story of Salman Khan's 'Dabangg 3' came to light, read detailed !! | OMG : सलमान खानच्या ‘दबंग-३’ची कथा झाली लिक, वाचा सविस्तर!!

OMG : सलमान खानच्या ‘दबंग-३’ची कथा झाली लिक, वाचा सविस्तर!!

लिवूडचा भाईजान सलमान खान याचा नुकताच रिलीज झालेला ‘ट्यूबलाइट’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर भलेही अपेक्षेपेक्षा अधिक कमाई करू शकला नसला तरी, चाहत्यांचे त्याच्यावरील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. कारण आगामी काळातील सलमानच्या चित्रपटांचा ओघ पाहता, त्याला आतापासूनच प्रेक्षकांनी बुक केले की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातील ‘टायगर जिंदा है’ आणि ‘दबंग-३’ या दोन चित्रपटांविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड आतुरता आहे. परंतु ‘दबंग-३’ची स्टोरी लिक झाल्याने, निर्मात्यांना हा मोठा धक्काच म्हणावा लागेल. आता तुम्ही म्हणाल की, स्टोरी कशी लिक झाली? कोणी लिक केली? तर याचे उत्तर ‘सलमान’ हेच आहे. कारण सलमाननेच चित्रपटाची कथा भावनेच्या भरात रिवील केली आहे. 

सलमानने नुकतेच मीडियाशी बोलताना हा प्रताप केला आहे. ‘दबंग-३’विषयी जेव्हा त्याला काही प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्याने चित्रपटाची स्क्रिप्ट सांगितली. भावनेच्या भरात तो असे काही बोलून गेला की, त्यामुळे चित्रपटाची कथा काय असेल याविषयीचा अंदाज लावणे सहज शक्य होत आहे. सलमानने म्हटले की, चित्रपटाची कथा ‘दबंग-३’नेच सुरू होणार आहे. त्यानंतर ती फ्लॅशबॅकमध्ये जाईल. यावेळी चुलबुल पांडेच्या सुरुवातीच्या आयुष्याविषयी सांगितले जाईल. मात्र ही संपूर्ण कथा फ्लॅशबॅकमध्ये असेल.’ 



जेव्हा सलमानला कथेविषयी आणखी विचारले असता तो म्हणाला की, चित्रपटात प्रेक्षकांना आजचा चुलबुल पांडे आणि सुरुवातीचा चुलबुल पांडे यांच्यातील फरक बघावयास मिळेल. फ्लॅशबॅकच्या माध्यमातूनच चुलबुल पांडे कसा घडत गेला? त्याच्यासोबत नेमके काय घडले होते? या व्यतिरिक्त सद्यस्थितीतील कथा दाखविली जाईल. ‘दबंग-३’विषयीच बोलले जात आहे, तर प्रेक्षकांना आणखी एक बदल यात बघावयास मिळेल. तो बदल म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शन सलमानचा भाऊ अरबाज खान करणार नाही. 

काही दिवसांपूर्वीच सलमानने स्पष्ट केले होते की, अरबाज शूटिंगच्या वेळी खूपच हायपर होत जातो. त्यामुळे यावेळेस त्याला निवांतपणे केवळ शूटिंग बघायची आहे. या सीरिजमध्ये तो फक्त प्रोड्यूसर म्हणून काम बघणार आहे. शिवाय आणखी एक फरक म्हणजे चित्रपटात सोनाक्षी सिन्हाचाही पत्ता कट करण्यात आला आहे. तिसºया भागात सोनाक्षी सिन्हा बघावयास मिळणार नाही. त्यामुळे तिच्या जागी कोणाची वर्णी लागेल हे बघणे मजेशीर असेल. 

Web Title: OMG: The story of Salman Khan's 'Dabangg 3' came to light, read detailed !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.