OMG!! ​सोनम कपूर मानणार का डॅडचा सल्ला? बांधणार का लग्नगाठ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 13:50 IST2017-07-11T08:20:05+5:302017-07-11T13:50:05+5:30

सोनम कपूर आणि आनंद आहूजा या दोघांचे रिलेशनशिप आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. सोनम व आनंद उघडपणे आपल्या नात्याविषयी ...

OMG !! Sonam Kapoor admits Dad's advice? How to build a wedding? | OMG!! ​सोनम कपूर मानणार का डॅडचा सल्ला? बांधणार का लग्नगाठ?

OMG!! ​सोनम कपूर मानणार का डॅडचा सल्ला? बांधणार का लग्नगाठ?

नम कपूर आणि आनंद आहूजा या दोघांचे रिलेशनशिप आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. सोनम व आनंद उघडपणे आपल्या नात्याविषयी बोलायला तयार नाही, हे खरे. पण दोघांच्याही सोशल अकाऊंटवरचे फोटो आणि सार्वजनिक ठिकाणचा  दोघांचा एकत्र वावर बरेच काही सांगणारा आहे. सोनम आणि आनंद दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत, हे सांगायला आता शब्दांची गरज नाही. केवळ प्रेमच नाही तर यापुढे जात, आनंद व सोनम दोघांच्या लग्नाच्या बातम्याही सध्या चर्चेत आहे. होय, फार काळ प्रतीक्षा न करता लवकर लग्न उरकून टाकण्याची दोघांची योजना असल्याचे कळतेय.  



ALSO READ :बॉयफ्रेंडने सोनम कपूरला म्हटले ‘प्रिन्सेस’

सोनम कपूर खरे तर एक बोल्ड अभिनेत्री आहे. परखड बोलणारी, मनासारखे जगणारी, अशी तिची ओळख आहे. आनंदबद्दल सोनम तूर्तास बोलायला तयार नाही. पण न बोलताच करिअरच्या या टप्प्यावर लग्नासारखा ‘बोल्ड’ निर्णय घ्यायला सोनम कदाचित तयार आहे. होय, सूत्रांचे मानाल तर, यंदा सोनमच्या लग्नाचे योग आहेत. सोनमचे डॅड अनिल कपूर याची तशी इच्छा आहे म्हणे. आनंदसोबत सोनम अतिशय आनंदात आहे. त्यामुळे सोनमने फार वेळ न घेता, लग्न उरकून टाकावे, असे अनिलचे मत आहे. अर्थात सोनमच्या काही जवळच्या मित्रांनी मात्र तिला फार घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. लग्नाच्या निर्णयामुळे सोनमच्या करिअरवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असे या मित्रांचे म्हणणे आहे. अर्थात सोनम करिअरची तमा बाळणाºयांपैकी नाहीच. त्यामुळे मित्रांऐवजी तिने आपल्या डॅडचा सल्ला मानण्याचे ठरवले आहे. एकंदर काय तर, सगळे काही जुळून आले तर, वेडिंग बेल्स विल रिंग्स इन द कपूर हाऊस सून!!

Web Title: OMG !! Sonam Kapoor admits Dad's advice? How to build a wedding?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.