OMG! ...​ तर काय लग्नानंतर दीपिका पादुकोण घेणार अभिनयातून संन्यास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 10:22 IST2018-04-01T04:52:03+5:302018-04-01T10:22:03+5:30

बॉलिवूडचे लव्हबर्डस रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यावर्षाच्या अखेरिसपर्यंत लग्नबंधनात अडकू शकतात. चर्चा खरी मानाल तर दोघांच्याही पालकांनी या ...

OMG! So, after the wedding, Deepika Padukone will take her from acting? | OMG! ...​ तर काय लग्नानंतर दीपिका पादुकोण घेणार अभिनयातून संन्यास?

OMG! ...​ तर काय लग्नानंतर दीपिका पादुकोण घेणार अभिनयातून संन्यास?

लिवूडचे लव्हबर्डस रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यावर्षाच्या अखेरिसपर्यंत लग्नबंधनात अडकू शकतात. चर्चा खरी मानाल तर दोघांच्याही पालकांनी या लग्नाची तारीख निश्चित केली आहे. या लग्नाची तयारीही सुरू  झाल्याची खबर आहे. यातच एक आणखी नवी खबर आहे. होय, लग्नानंतर दीपिका अभिनय सोडून आपल्या कौटुंबिक आयुष्यात बिझी होऊ शकते. दीपिकाला म्हणे, लग्नानंतर खूप सारी मुलं हवी आहेत. खुद्द दीपिकाने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. लग्नानंतर कदाचित मी अ‍ॅक्टिंग सोडून फॅमिली लाईफमध्ये बिझी होऊ शकते. माझ्यासाठी कुटुंबापेक्षा मोठे काहीही नाही. मला खूप सारी मुलं हवी आहेत. मला कुटुंबाचे महत्त्व ठाऊक आहे. कुटुंब तुमच्या आयुष्याला पूर्णत्व देते, असे दीपिका या मुलाखतीत म्हणाली. अर्थात लग्नाचा प्लान कधी आहे? हा प्रश्न मात्र  दीपिकाने चतुराईने टाळला. मला माहित नाही, मी लग्न कधी करेल. सध्या तरी अशी कुठलीही योजना नाही,असे दीपिका म्हणाली.



मुंबई मिररने दिलेल्या बातमीनुसार, दीपिका व रणवीर या दोघांनी लग्नासाठी यावर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यातील चार तारखा निश्चित केल्या आहेत. यापैकी एक तारीख अंतिमत: निश्चित करण्यात येईल. दीपिका व रणवीरचे लग्न एक खासगी सोहळा असेल. केवळ कुटुंबातील व्यक्ती आणि अतिशय जवळचे मित्र व नातेवाईक एवढेच या लग्नात असतील. काही दिवसांपूर्वी दीपिका आपल्या आईसोबत दागिण्यांची खरेदी करताना दिसली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका व रणवीर या दोघांनाही डेस्टिनेशन वेडिंग हवे आहे. पण त्यांच्या कुटुंबाना मात्र हे मान्य नाही. त्यामुळे हे लग्न मुंबईतचं होण्याची शक्यता अधिक आहे.  रणवीर व दीपिका दोघांनाही समुद्र किनारा खूप आवडतो. त्यामुळे लग्नासाठी बीच वेडिंगचा पर्याय निवडला जाण्याची दाट शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. 

ALSO READ : लग्नाच्या तयारीला लागली दीपिका पादुकोण 'या' शहरात करतेय कुटुंबीयांसोबत शॉपिंग!

Web Title: OMG! So, after the wedding, Deepika Padukone will take her from acting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.