​OMG !!! सिद्धार्थ मल्होत्रासोबत झाले ब्रेकअप; आता ‘या’ अभिनेत्याशी वाढतेयं आलिया भट्टची जवळीक !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 12:26 IST2017-09-04T06:56:57+5:302017-09-04T12:26:57+5:30

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ब्रेकअपची सध्या जोरदार चर्चा आहे. कधी आलियाच्या पजेसिव स्वभावामुळे सिद्धार्थ तिच्यापासून दूर झाला, ...

OMG !!! Siddharth Malhotra's breakup; Now Alia Bhatt's relationship with the actress goes on !! | ​OMG !!! सिद्धार्थ मल्होत्रासोबत झाले ब्रेकअप; आता ‘या’ अभिनेत्याशी वाढतेयं आलिया भट्टची जवळीक !!

​OMG !!! सिद्धार्थ मल्होत्रासोबत झाले ब्रेकअप; आता ‘या’ अभिनेत्याशी वाढतेयं आलिया भट्टची जवळीक !!

िया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ब्रेकअपची सध्या जोरदार चर्चा आहे. कधी आलियाच्या पजेसिव स्वभावामुळे सिद्धार्थ तिच्यापासून दूर झाला, अशी बातमी आली तर कधी या दोघांमध्ये प्रेम वगैर नसून दोघेही केवळ चांगले मित्र आहेत, असे ऐकायला आले. या बातम्यांचा आलिया व सिद्धार्थ या दोघांवर किती परिणाम झाला, ते आम्हाला ठाऊक नाही. पण या दोघांचे चाहते मात्र सध्या या सर्व बातम्यांमुळे चांगलेच हिरमुसले आहेत. कारण ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ नंतर या दोघांना एकत्र पाहणे, चाहत्यांना आवडू लागले होते. पण अलीकडे सिद्धार्थ नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये आला आणि मी अद्यापही सिंगल आहे. माझे कुणाशीच अफेअर नाही, असे सांगून त्याने सर्व चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. अर्थात यानंतर सिद्धार्थ व जॅकलिन फर्नांडिस या दोघांमधील जवळीक वाढल्याचेही दिसू लागले. केवळ सिद्धार्थचं नाही तर आलियाला सुद्धा नवा मित्र मिळाला.



होय, नवी बातमी हीच आहे. सिद्धार्थ आपल्या आयुष्यात पुढे निघालेला बघून आलियानेही मागे वळून न पाहण्याचा निर्णय घेतला म्हणे. तूर्तास ती सिद्धार्थला सोडून आपल्या एका मित्राच्या बरीच जवळ गेल्याचे कळतेय. हा मित्र दुसरा तिसरा कुणी नसून रणबीर कपूर असल्याचेही समजतेयं. सूत्रांचे मानाल तर, रणबीरसोबतची वाढती जवळीक हेच आलिया व सिद्धार्थच्या ब्रेकअपचे कारण ठरलेय. रणबीरवरून दोघांमध्ये प्रचंड भांडणे झालीत आणि अखेर या भांडणाचा शेवट ब्रेकअपमध्ये झाला, अशीही चर्चा आहे.

ALSO READ : SHOCKING !! आलिया भट्टचा ‘हा’ न्यूड फोटो खरा की खोटा?

लवकरच आलिया व रणबीर ‘ड्रगन’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. तसे आलिया व रणबीर जुने मित्र आहेत. रणबीरसोबतची मैत्री आलियाने कधीही लपवलेली नाही. आता ही मैत्री आणखी किती पुढे जाते, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.

Web Title: OMG !!! Siddharth Malhotra's breakup; Now Alia Bhatt's relationship with the actress goes on !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.