OMG !! ​वर्गमित्राने मीरा राजपूतबद्दल केले धक्कादायक खुलासे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2017 10:32 IST2017-03-20T05:01:05+5:302017-03-20T10:32:52+5:30

अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत हिने अलीकडे कामकाजी महिलांबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. कामकाजी महिलांना मुलांपेक्षा ...

OMG !! Shocking disclosures made by a classmate for Mira Rajput! | OMG !! ​वर्गमित्राने मीरा राजपूतबद्दल केले धक्कादायक खुलासे!

OMG !! ​वर्गमित्राने मीरा राजपूतबद्दल केले धक्कादायक खुलासे!

िनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत हिने अलीकडे कामकाजी महिलांबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. कामकाजी महिलांना मुलांपेक्षा स्वत:चे करिअर महत्त्वाचे वाटते. फक्त काही तास मुलीसोबत घालवून मला कामासाठी घराबाहेर जायचे नाहीये. जर असंच करायचे असते तर मला तिची गरजच काय  होती? मिशा काही कुत्र्याचे पिल्लू नाही. मला तिला मोठे होताना पाहायचे आहे, असे मीरा या मुलाखतीदरम्यान म्हणाली होती. तिच्या या वक्तव्यावरुन वादंग निर्माण झाले होते. कोणतीही आई आपल्या मुलाला आनंदाने घरी सोडून कामाला जात नाही, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर  उमटल्या होत्या. अनेकांनी या विधानावरून मीराला फैलावर घेतले होते.  मीरा जे काही बोलली त्यानंतर अनेक कामकाजी महिलांनी तिच्या नावे खुले पत्र लिहिले होते. आता मीराच्या एका वर्गमित्रानेही असेच एक खुले पत्र लिहिले आहेत. या पत्रात त्याने मीराबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.  कॉलेजातील मुलींचे  कपडे आणि फिटनेस पाहून मीरा मुलींबद्दल मत बनवायची. मुलींचे कपडे आणि त्यांचे सौंदर्य याच आधारावर ती प्रत्येक मुलीला जज करायची, असे मीराच्या या वर्गमित्राने म्हटले आहे.

ALSO READ : शाहिद कपूरने केला पत्नी मीरा राजपूतचा बचाव; वाचा, नेमकं काय आहे प्रकरण?

या वर्गमित्राने मीरा उद्देशून काय लिहिले ते वाचा, त्याच्याच शब्दात. या वर्गमित्राने लिहिलेय की,
 डियर मीरा, तुझा इंटरव्ह्यू पाहिला. तुझे विचार ऐकून खरच दु:ख झाले. आपण तीन वर्षे एकाच कॉलेजात आणि एकाच वर्गात घालवले आहेत. मी दाव्यानिशी सांगतो की, तुझे   फेमिनिज्मबद्दलचे विधान केवळ एक देखावा आहे. मीरा, कॉलेजमध्ये तू आणि तुझ्या मैत्रिणी बाकी मुलींना त्यांचे कपडे व स्कीनवरूच जज करायचे. ज्या मुली तुझ्या मतानुसार, फॅशनमध्ये कमी पडायच्या, त्यांच्याकडे तू ज्या तुच्छतेने बघायची, त्यावरून तुझे विचार किती खुजे आहेत, हेच दिसते आणि हो, वर्कींग वूमनबद्दल तू जे काही बोललीस, ते विसरता येण्यासारखे नाही. तुझे हे विधान आपल्याला महिलांच्या वर्तमानस्थितीतील सक्षमीकरण्याच्या युगात घेऊन जाते, ज्याबद्दल तुला काहीच माहित नाही.

Web Title: OMG !! Shocking disclosures made by a classmate for Mira Rajput!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.