OMG ! ​शाहरूख खानला ‘मन्नत’ पुन्हा एकदा भोवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 10:37 IST2017-03-22T05:07:38+5:302017-03-22T10:37:38+5:30

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान ‘मन्नत’मुळे  पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडण्याची चिन्हे आहेत. होय, मन्नत म्हणजे, शाहरूखचा शाही बंगला. ...

OMG! Shah Rukh Khan to make 'Mannat' again? | OMG ! ​शाहरूख खानला ‘मन्नत’ पुन्हा एकदा भोवणार?

OMG ! ​शाहरूख खानला ‘मन्नत’ पुन्हा एकदा भोवणार?

लिवूडचा किंग खान शाहरूख खान ‘मन्नत’मुळे  पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडण्याची चिन्हे आहेत. होय, मन्नत म्हणजे, शाहरूखचा शाही बंगला. या बंगल्याच्या जागेत भाडेकरारातील अटी आणि शर्थींचे  उल्लंघन केल्याचा आरोप शाहरूखवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी शाहरूख दोषी आढळलाच तर, त्याला कोट्यवधी रूपयांचा दंड होऊ शकतो.
शाहरूखचा मन्नत हा बंगला शासनाच्या जागेवर उभा आहे. होय, म्हणजे, शाहरूखने ही शासनाकडून ही जागा भाडेकराराने रहायला घेतली आहे. भाडेकरार करताना सरकारने शाहरुखला काही नियम आणि अटी घालून दिल्या होत्या. मात्र, काही कालावधीनंतर या नियम व अटी शाहरुखने धाब्यावर बसवल्या.  याबबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली असून, सरकार या प्रकरणाची चौकशी करण्याची शक्यता आहे. या चौकशीत शाहरुख दोषी आढळल्यास शाहरूखला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते.



नियम आणि अटींचे उल्लंघन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूवीर्ही शाहरूखने बंगल्याबाहेर अनधिकृतरित्या बांधकाम केले होते. तक्रार आल्यावर महापालिकेने हे बांधकाम तर तोडलेच पण, त्यासाठी आलेला खर्चही शाहरुखकडून वसूल करण्यात आला होता. शाहरूखने केलेल्या अवैध बांधकाम पाडण्याचा खर्च म्हणून पालिकेने १लाख ९३ हजार ७७४ रुपए इतकी रक्कम दंड रूपाने वसूल केली होती.  शाहरुखने मन्नत या बंगल्याबाहेर व्हॅनिटी वॅन पार्क करण्यासाठी  रॅम्प बांधला होता.

ALSO READ :  शाहरूख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात भुताटकी येते तेव्हा..!

शाहरुखने बांधलेल्या रॅम्पमुळे सर्वसामान्य नागरीकांची अडचण होत होती. तसेच, वाहन चालवतानाही अडथळे येत असल्याची स्थानिक नागरीकांची तक्रार होती. या तक्रारीनंतर  पालिकेने स्वत: कारवाई करत फेब्रुवारी २०१५ मध्ये एच के भाभा रोड आणि माऊण्ट मेरी रोडच्या जंक्शनवर असलेला हा रॅम्प  तोडून टाकला होता. 

Web Title: OMG! Shah Rukh Khan to make 'Mannat' again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.