OMG : सर्व्हिस टॅक्स अधिकाऱ्यांनी घेतली गोविंदाची झडती!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2017 03:38 PM2017-03-23T15:38:55+5:302017-03-24T13:11:15+5:30

बॉलिवूडचा ‘नंबर १ हीरो’ सध्या चांगलाच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण ६० लाख रुपयांचा सर्व्हिस टॅक्स लपविण्याच्या प्रयत्नात असलेल्या ...

OMG: Service tax official took notice of Govinda | OMG : सर्व्हिस टॅक्स अधिकाऱ्यांनी घेतली गोविंदाची झडती!

OMG : सर्व्हिस टॅक्स अधिकाऱ्यांनी घेतली गोविंदाची झडती!

googlenewsNext
लिवूडचा ‘नंबर १ हीरो’ सध्या चांगलाच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण ६० लाख रुपयांचा सर्व्हिस टॅक्स लपविण्याच्या प्रयत्नात असलेल्या गोविंदाची सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंटकडून कसून चौकशी केली जात असून, त्याचे स्टेटमेंटही रेकॉर्ड केले आहे. त्यामुळे त्याच्याकडून काही चुकीच्या घटना घडल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर चोरीचा आरोप लावला जाण्याची शक्यता आहे. 

‘सेंट्रल बोर्ड आॅफ एक्साइज अ‍ॅण्ड कस्टम’ सर्व्हिस डिपार्टमेंटला गोविंदा सर्व्हिस टॅक्सची माहिती लपवित असल्याचा संशय होता. त्यामुळे त्यांनी गोविंदाची कसून चौकशी केली. वृत्तानुसार गेल्या शुक्रवारी सर्व्हिस टॅक्स विभागाकडून गोविंदाला नोटीस पाठविण्यात आली होती. पुढे त्याला समन्स बजावण्यात आला, मात्र त्याला त्याने काहीच उत्तर दिले नाही. त्यानंतर सर्व्हिस टॅक्स विभागाच्या अधिकारी गोविंदाच्या जुहू स्थित आॅफिसवर धाड टाकत सर्व खात्यांची माहिती घेतली. यावेळी अधिकाºयांनी गोविंदाच्या गेल्या तीन वर्षांच्या बॅँक खात्यांची कसून चौकशी केली. त्यामधून गोविंदाने याकाळात सुमारे पाच कोटी रुपयांची कमाई केल्याचे निष्पन्न झाले.

यावेळी अधिकाºयांनी गोविंदाला आदेश दिला की, जर त्याला कायदेशीर प्रक्रियेपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर त्याने पुढच्या काही आठवड्यांमध्येच सर्व्हिस टॅक्स भरावा, अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे. सूत्रानुसार गोविंदाने टीव्ही शो, जाहिराती आणि चित्रपटांमधून ही रक्कम कमावली आहे. मात्र गोविंदाने कमाईच्या रक्कमेतील टॅक्स न भरता ती रक्कम स्वत:च खर्च केली. गोविंदाने नुकतेच ‘आ गया हीरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमाई केली आहे. मात्र त्याचा हा चित्रपट बॉलिवूडवर फारसा करिष्मा दाखवू शकला नाही. 

Web Title: OMG: Service tax official took notice of Govinda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.