OMG : संजय दत्तला पुन्हा जावे लागेल कारागृहात? वाचा सविस्तर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 19:45 IST2017-07-27T14:15:04+5:302017-07-27T19:45:04+5:30

अभिनेता संजय दत्त शिक्षा भोगून बाहेर आला असला तरी, त्याच्या मागील शुक्लकाष्ट संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे. कारण ...

OMG: Sanjay Dutt to go to jail again? Read detailed! | OMG : संजय दत्तला पुन्हा जावे लागेल कारागृहात? वाचा सविस्तर !

OMG : संजय दत्तला पुन्हा जावे लागेल कारागृहात? वाचा सविस्तर !

िनेता संजय दत्त शिक्षा भोगून बाहेर आला असला तरी, त्याच्या मागील शुक्लकाष्ट संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे. कारण संजय दत्तला न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेचा कालावधी पूर्ण न करताच त्याची चुकीच्या पद्धतीने मुक्तता केल्याचा ठपका राज्य सरकारवर ठेवला जात आहे. त्यामुळे संजय दत्तला पुन्हा एकदा कारागृहात जावे लागेल काय? असा प्रश्न उपस्थित आता केला जात आहे. एव्हाना राज्य सरकारने आता तसे संकेतच दिल्याने, संजूबाबाच्या अडचणीत वाढ झाली आहे.  

संजय दत्त शिक्षा प्रकरणावर स्पष्टीकरण देताना राज्य सरकारने म्हटले की, संजय दत्तची तुरुंगातून लवकर सुटका करणे हा निर्णय नियमांच्या आधारेच घेण्यात आला आहे. परंतु अशातही उच्च न्यायालयाला राज्य सरकारचा निर्णय चुकीचा वाटत असेल तर आम्ही संजय दत्तला पुन्हा एकदा कारागृहात टाकू असे स्पष्टीकरण गुरुवारी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहे. राज्य सरकारने न्यायालयाला दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे संजूबाबाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

१९९३च्या बॉम्बस्फोटानंतर बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या संजय दत्तची आठ महिने अगोदरच सुटका करण्यात आली होती. मात्र त्याची ही सुटका वादग्रस्त ठरत असल्याने राज्य सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. पुण्यातील प्रदीप भालेकर यांनी तर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत, संजय दत्तची सुटका आठ महिने अगोदर कुठल्या आधारे केली, असा प्रश्न उपस्थित केला होता. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली असता राज्य सरकारने उच्च न्यायालयाला स्पष्टीकरण दिले आहे. 

न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. राज्य सरकारची बाजू ऐकल्यानंतर आमची अशी भूमिका नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. फक्त कायद्याचे पालन न करता संजूबाबाला आठ महिने अगोदर कुठल्या आधारे सोडले याचे आम्हाला स्पष्टीकरण अपेक्षित आहे. दरम्यान, संजय दत्तने कारागृहात सामान्य कैद्याप्रमाणे शिक्षा भोगली आहे. कारागृहातील चांगले वर्तन लक्षात घेऊनच त्याची आठ महिने अगोदर सुटका करण्यात आली आहे. 

Web Title: OMG: Sanjay Dutt to go to jail again? Read detailed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.