OMG!! ​सलमान खानने का कमी केले १७ किलो वजन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 11:29 IST2017-03-08T05:59:20+5:302017-03-08T11:29:20+5:30

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ अर्थात सलमान खान याचा ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ...

OMG !! Salman Khan reduces the weight of 17 kg? | OMG!! ​सलमान खानने का कमी केले १७ किलो वजन?

OMG!! ​सलमान खानने का कमी केले १७ किलो वजन?

लिवूडचा ‘दबंग खान’ अर्थात सलमान खान याचा ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी सलमान सध्या बरीच मेहनत घेतोय. या चित्रपटाचे शूटींग झिरो फ्रीजिंग लोकेशनवर म्हणजेच हाडे गोठवणा-या थंडीत होणार आहे, हे तुम्ही ऐकले असेलच. पण आता आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत, ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 
होय, सलमानने म्हणे या चित्रपटासाठी १७ किलो वजन घटवले आहे. येत्या १५ मार्चपासून आॅस्ट्रियात या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. यापूर्वी ‘सुल्तान’साठी सलमानने आपले वजन वाढवले होते. आता ‘टायगर जिंदा है’मध्ये तो पुन्हा आपल्या अंदाजात परतणार आहे. १७ किलो वजन कमी करण्यासाठी सलमानने अगदी काटेकोटरपणे डाएट फॉलो केले.

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘टायगर जिंदा है’ हा २०१२ साली रिलीज झालेल्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सिक्वल आहे.  या चित्रपटात सलमानसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात सलमान खान भारतीय एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे तर कॅटरिना कैफ ही पाकिस्तानी ऐजंटची भूमिका करणार आहे. तब्बल पाच वर्षांनंतर सलमान खान व कॅटरिना कैफ ‘टायगर जिंदा है’च्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. या चित्रपटाची कथा तेथून सुरू होणार आहे. जेथे ‘एक था टायगर’ची कथा संपली होती. या चित्रपटाची कथा आजच्या काळातीलच असेल. यात सलमान खान व कॅटरिना कैफ ‘एक था टायगर’मधील पात्रांमध्येच पहायला मिळतील. चित्रपटातील पात्रांच्या वयात कोणताच बदल झालेला दिसणार नाही. टायगर जिंदा है मधील अ‍ॅक्शन दृष्ये हे डोळ्यांचे पारणे फे डणारी ठरणार आहे. यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून प्रेक्षकांना ही दृष्ये आश्चर्यकारक वाटणारी ठरणार आहे.
 

Web Title: OMG !! Salman Khan reduces the weight of 17 kg?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.