OMG !! सलमान खान असा काही बिथरला की, चाहत्याच्या फोनचे केले तुकडे-तुकडे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 15:18 IST2017-09-04T09:39:34+5:302017-09-04T15:18:10+5:30
सलमान खान थोडा काय, बराच मूडी आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. हसता-हसता कुणावर तो कधी अन् कसा बिथरेल, हे ...

OMG !! सलमान खान असा काही बिथरला की, चाहत्याच्या फोनचे केले तुकडे-तुकडे!
स मान खान थोडा काय, बराच मूडी आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. हसता-हसता कुणावर तो कधी अन् कसा बिथरेल, हे सांगता यायचे नाही. अलीकडे एका अवार्ड शोमध्ये असेच काही झाले.
या अवार्ड शोमध्ये सलमान आपल्या एका चाहत्यावर असा काही बिथरला की, बिचाºया त्या चाहत्याला आपला महागडा फोन गमवावा लागला. या शोमध्ये सलमान आपल्या जवळच्या लोकांसोबत पोहोचला होता. याचदरम्यान एक चाहता सलमानजवळ आला आणि स्वत:चा अनब्रेकेबल फोन दाखवू लागला. आधी सलमानने या चाहत्याकडे दुर्लक्ष केले. पण तो चाहता काही जुमानेना. माझा फोन अनब्रेकेबल आहे, हे तो वारंवार सलमानला सांगू लागला. मग काय, सलमानचे टाळके फिरणारच. सलमानने त्या चाहत्याकडून फोन हिसकावला अन् जमीनीवर आदळला. अर्थात फोन तुटला नाहीच. मग काय, सलमानने तो पुन्हा उचलला आणि दुसºयांदा जोरात आपटला. दुसºयांदाही फोनला काहीच झाले नाही. सलमान खुद्द हा खेळ खेळतोय, म्हटल्यावर त्याठिकाणी एकच गर्दी जमली. या गर्दीने काय करावे, तर ती गर्दी फोन तोडण्यासाठी सलमानला चीअर करायला लागली. मग सलमानलाही जोर चढला. त्याने फोन वारंवार जमिनीवर आपटला. शेवटी फोनच तो. तुटणारच. फोनचे तुकडे-तुकडे झालेत. सलमानने ते सगळे गोळा केलेत अन् त्या चाहत्यासमोर धरलेत अन् हाच का तुझा अनब्रेकेबल फोन, असे म्हणून जोरजोरात हसू लागला. सलमान असा वागेल, अशी अपेक्षाही त्या चाहत्याने केली नसावी. मग काय, तो चाहता बिचारा चांगलाच हिरमुसला अन् गर्दी, तिचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले.
सध्या सल्लू ‘टायगर जिंदा है’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. यात सलमान कॅटरिना कैफसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
ALSO READ : सलमान खान व कॅटरिना कैफचा इंटिमेट फोटो होतोय वेगाने व्हायरल ! बघितला नसेल तर इथे बघा!!