OMG...! तैमूरमुळे करीना कपूर सैफ अली खानच्या नात्यात दुरावा? खुद्द सैफनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 13:49 IST2019-02-13T13:47:40+5:302019-02-13T13:49:29+5:30

तैमूर अली खानच्या जन्मानंतर करीना कपूर खूपच व्यग्र झाली असून तिला तिचा पती सैफ अली खानलादेखील वेळ देता येत नाही. ही बाब व्हॅलेंटाइन वीकमध्ये सैफ अली खानने सांगितली.

OMG ...!saif ali khan complaint to kareena kapoor khan regarding taimoor ali khan? | OMG...! तैमूरमुळे करीना कपूर सैफ अली खानच्या नात्यात दुरावा? खुद्द सैफनेच केला खुलासा

OMG...! तैमूरमुळे करीना कपूर सैफ अली खानच्या नात्यात दुरावा? खुद्द सैफनेच केला खुलासा

ठळक मुद्देकरीनाने सैफला सांगितले की एका रोमँटिक डेटची आशा करते आणि तीही लवकरच

तैमूर अली खानच्या जन्मानंतर करीना कपूर खूपच व्यग्र झाली असून तिला तिचा पती सैफ अली खानलादेखील वेळ देता येत नाही. ही बाब व्हॅलेंटाइन वीकमध्ये सैफ अली खानने सांगितली. 

एका रेडिओ शोमध्ये सैफने त्याची पत्नी करीनाला संबोधित करीत म्हणाला की, 'हाय ! करीना, तुझ्या रेडिओ शोमध्ये तुला प्रश्न विचारणे ही खूप चांगली कल्पना आहे. एकदा मुल झाले की नाते व गोष्टी बदलत जातात. पत्नी मुलांसोबत व्यग्र होऊन जाते आणि नाते हळूहळू बदलत जाते. पत्नी आधी नवऱ्याला जेवढा वेळ देऊ शकत होती. तितका वेळ तिला मुल झाल्यावर देता येत नाही. माझा प्रश्न यावरच आधारीत आहे की मुलाच्या जन्मानंतर नवऱ्याला जास्त अटेंशन मिळेल आणि पती पत्नीला जास्त खूश ठेऊ शकेल, यासाठी काही उपाय आहे का?'


त्यावर करीनाने ही नटखट गोष्ट आहे सैफू की तू नॅशनल रेडिओवर हा प्रश्न विचारलास असे म्हणत याचे उत्तर दिले की, 'मला वाटते की नेहमीच पती आपल्या पत्नीची साथ दिली पाहिजे. मुल म्हणजे खूप साऱ्या जबाबदाऱ्या आणि जर तुम्ही जबाबदारी वाटून घ्याल तेव्हा पत्नी स्वतःहून खूश होईल. जिथपर्यंत माझ्या अटेंशनची गोष्ट आहे तर... एका चांगल्या ठिकाणी तुमच्या पत्नीला रोमँटिक डेटला नेण्याचा प्लान करा जिथे तुमचा मुलगा नसेल आणि मग पहा जादू.'


करीनाने पुढे सांगितले की,' जर तुम्हाला तुमची पत्नी आपल्या मुलासोबत वेळ व्यतित करायचे आहे, असे सांगेल. त्यावेळी वाईट मानून घेऊ नका. याचा अर्थ हा नाही की तिचे तुमच्यावर कमी प्रेम आहे. याचा अर्थ हाच आहे काही वेळापुरता तिचा दृष्टीकोन बदलला आहे. बाकी सगळे जाऊ दे, मी तुझ्याकडून एका रोमँटिक डेटची आशा करते आणि तीही लवकरच.'

Web Title: OMG ...!saif ali khan complaint to kareena kapoor khan regarding taimoor ali khan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.