OMG!! ​रणवीर सिंगचे ‘रॅप’ तुम्ही पाहिलेत? मुंबईकरांसोबत रंगली जुगलबंदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 13:33 IST2017-12-14T08:03:21+5:302017-12-14T13:33:21+5:30

रणवीर सिंग म्हणजे बॉलिवूडचा सर्वाधिक एनर्जेटिक अभिनेता. ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावती’मध्ये असाच एनर्जेटिक परफॉर्मन्स दिल्यानंतर हा ‘बेफिक्रे’ स्टार मुंबईत काही रॅपर्ससोबत रॅप करताना दिसतोय.

OMG !! Ranveer Singh's 'Rap'? Junk to be mixed with Mumbai! | OMG!! ​रणवीर सिंगचे ‘रॅप’ तुम्ही पाहिलेत? मुंबईकरांसोबत रंगली जुगलबंदी!

OMG!! ​रणवीर सिंगचे ‘रॅप’ तुम्ही पाहिलेत? मुंबईकरांसोबत रंगली जुगलबंदी!

वीर सिंग म्हणजे बॉलिवूडचा सर्वाधिक एनर्जेटिक अभिनेता. ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावती’मध्ये असाच एनर्जेटिक परफॉर्मन्स दिल्यानंतर हा ‘बेफिक्रे’ स्टार मुंबईत काही रॅपर्ससोबत रॅप करताना दिसतोय. होय, काही तासांआधी रणवीरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात रणवीर काही रॅपरसोबत रॅप करताना दिसतोय आणि त्याचे रॅप जबरदस्त आहे.
आपल्यातील प्रतिभेच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करणारा अभिनेता रणवीर सिंग हा नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो.  संधी मिळेल तेव्हा स्वत:तील कौशल्य तो चाहत्यांना दाखवत असतो.  काही दिवसांपूर्वी‘ट्रॅप्ड’ या चित्रपटाच्या टीमसोबत रणवीर रॅप करताना दिसला होता. आता तो मुंबईकरांसोबत रॅप करताना दिसलाय.




व्हिडिओतील रणवीरचे रॅप जबरदस्त आहे. या व्हिडिओत त्याने धमाकेदार परफार्मन्स देत, आपण एक उत्कृष्ट रॅपर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अर्थात तुम्हाला हे पटत नसेल, तर हा व्हिडिओ तुम्ही पाहायलाच हवा. तेव्हा बघा आणि रणवीरचे रॅप कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा.

ALSO READ : आपल्या बॉयफ्रेन्डसोबत कॅटरिना कैफचा ‘रोमान्स’ दीपिका पादुकोण पाहु शकेल?

‘पद्मावती’नंतर रणवीर झोया अख्तरच्या ‘गली बॉईज’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणवीर आणि आलिया भट्टची फ्रेश जोडी दिसणार आहे.  या चित्रपटात रणवीर केवळ अभिनयच करणार नाहीयं तर तो एका रॅपरच्या भूमिकेतही दिसणार आहे. रॅपरची भूमिका म्हणजे, या चित्रपटासाठी रणवीर स्वत: एक वा दोन रॅप लिहिणार आहे.   याआधी अनेक टीव्ही शो व अवाडर््स शोमध्ये रणवीर रॅप करताना दिसला आहे. अलीकडे काही ब्रँडसाठीही रणवीर रॅप करताना दिसला होता?  आता रणवीर या टॅलेंटचा वापर  ‘गली ब्वॉईज’ या चित्रपटासाठी करणार आहे. कदाचित रणवीरचा हा ताजा व्हिडिओ या तयारीचाच भाग असावा.

Web Title: OMG !! Ranveer Singh's 'Rap'? Junk to be mixed with Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.