OMG !! ​‘जग्गा जासूस’नंतर रणबीर कपूरने घेतला एक मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 15:03 IST2017-08-01T09:33:08+5:302017-08-01T15:03:08+5:30

रणबीर कपूरचा ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट बरीच वर्षे रखडला...मग कसाबसा तयार झाला...अर्थात तयार होण्यासाठी चित्रपटाने तीन वर्षे घेतलीत. अलीकडे ...

OMG !! Ranbir Kapoor took a big decision after 'Jagga spy'! | OMG !! ​‘जग्गा जासूस’नंतर रणबीर कपूरने घेतला एक मोठा निर्णय!

OMG !! ​‘जग्गा जासूस’नंतर रणबीर कपूरने घेतला एक मोठा निर्णय!

बीर कपूरचा ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट बरीच वर्षे रखडला...मग कसाबसा तयार झाला...अर्थात तयार होण्यासाठी चित्रपटाने तीन वर्षे घेतलीत. अलीकडे हा चित्रपट रिलीज झाला. पण दुर्दैवाने बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला. दिग्दर्शक अनुराग बासू आणि या चित्रपटाचा लीड हिरो रणबीर कपूर या दोघांना चित्रपटाकडून ब-याच अपेक्षा होत्या. रणबीर कपूरला तर जरा जास्तच. होय, कारण हा चित्रपट रणबीरने प्रोड्यूस केला होता. या चित्रपटाद्वारे रणबीरने प्रॉडक्शन क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले होते. पण चित्रपट आपटला आणि रणबीरचा पहिलाच प्रयत्न फसला. त्यामुळे रणबीरने म्हणे आता एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे, काही दिवस ‘प्रॉडक्शन’च्या फंदात न पडण्याचा.

सूत्रांचे खरे मानाल तर, रणबीर आता कुठलाही चित्रपट प्रोड्यूस करू इच्छित नाही. ‘जग्गा जासूस’मुळे रणबीरला बराच तोटा सहन करावा लागला आहे. खरे तर ‘जग्गा जासूस’नंतर रणबीर अनुरागचाच दुसरा चित्रपट प्रोड्यूस करणार होता. हा चित्रपट किशोर कुमार यांच्या आयुष्यावर आधारित होता. पण कदाचित रणबीर आता हा चित्रपट प्रोड्यूस करणार नाही. रणबीर तूर्तास आपल्या अभिनयावर लक्ष केंद्रीत करण्याच्या मूडमध्ये आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या बायोपिकमध्ये सध्या तो बिझी आहे.

‘जग्गा जासूस’ कदाचित तुम्ही पाहिला नसेल तर तुम्हाला सांगायला आम्हाला आवडेल, ते म्हणजे, हा एक नवा प्रयोग होता. यात सर्व गोष्टी ‘म्युझिकल’ स्वरूपात सांगितल्या गेल्या होत्या. बॉलिवूडमधील अशाप्रकारचा हा पहिला प्रयोग होता. पण रणबीर व अनुराग बासू यांचा हा प्रयोग बºयाच लोकांना आवडला नाही. अर्थात काहींना मात्र हा प्रयोग मनापासून भावला. ‘जग्गा जासूस’ भावणा-यांमध्ये अमिताभ बच्चन यांचेही नाव घेता येईल.

Web Title: OMG !! Ranbir Kapoor took a big decision after 'Jagga spy'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.