OMG!! रणबीर कपूर-कॅटरिना कैफ स्वतंत्रपणे करणार ‘जग्गा जासूस’चे प्रमोशन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 18:11 IST2017-01-20T18:11:09+5:302017-01-20T18:11:09+5:30
तुम्ही ‘बी टाऊन’ चे लव्हबर्ड्स असलेल्या रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांचे चाहते आहात का? तुमच्यासाठी एक वाईट बातमी ...

OMG!! रणबीर कपूर-कॅटरिना कैफ स्वतंत्रपणे करणार ‘जग्गा जासूस’चे प्रमोशन?
त म्ही ‘बी टाऊन’ चे लव्हबर्ड्स असलेल्या रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांचे चाहते आहात का? तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. ‘जग्गा जासूस’ या चित्रपटामुळे एकत्र आलेलं हे रोमँटिक कपल आता चित्रपटाचे स्वतंत्रपणे प्रमोशन करणार आहे. त्यांनी असे का केले ? असे तुम्हाला वाटणे साहजिक आहे. मात्र, दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी प्रमोशनसाठी एक धम्माल आयडिया शोधून काढली आहे. ती अशी की,‘ रणबीर आणि कॅटरिना यांना काही मोजक्या ठिकाणीच प्रमोशनल इव्हेंट्ससाठी एकत्र जावे लागणार आहे. तसेच त्यांना शहरातही एकत्र फिरण्याची गरज नाही. कारण अनुरागने त्यांचे प्रवासाचे बुकिंग हे वेगवेगळ्या ठिकाणी केलेले आहे. फक्त काही महत्त्वाच्या ठिकाणी मात्र त्या दोघांनाही एकत्र जाणे अनिवार्य आहे.’
बॉलिवूडच्या ‘मोस्ट हॉट कपल’ पैकी एक रणबीर-कॅटरिनाला मानले जाते. चाहत्यांकडूनही या कपलला प्रचंड कौतुक आणि प्रेम मिळतं. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून त्या दोघांचे ब्रेकअप झाले आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप याने त्याच्या ‘जग्गा जासूस’ चित्रपटाची घोषणा क रताच त्याला या दोघांच्या ब्रेकअपचा सामना करावा लागला. त्यांच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात दुरावा निर्माण झाला होता की, चित्रपटातील रोमँटिक सीन्सच्या शूटिंगदरम्यानही या दोघांनी ‘बॉडी डबल्स’ चा वापर केला. अखेरीस, चित्रपट ७ एप्रिलला रिलीज होणार असून पुन्हा ही जोडी सर्वांना आॅनस्क्रीन रोमान्स करताना पहायला मिळणार आहे.
‘अजब प्रेम की गजब कहानी’,‘राजनिती’,‘फुड्डू’ यासारख्या चित्रपटांमध्ये रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ या जोडीनं एकत्र काम केलं. अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटानंतर त्यांच्यातील प्रेम बहरलं आणि थोड्या कालावधीनंतर मात्र त्यांच्या प्रेमात दरी निर्माण झाली. आता ‘जग्गा जासूस’ च्या निमित्तानं हे दोघं पुन्हा एकत्र येत आहेत, ही आनंदाचीच बातमी आहे.
Also Read :
* रणबीर कपूरच्या विरहात कॅटरिना कैफ झाली ‘शायर’!
* ‘जग्गा जासूस’ मध्ये अशी दिसेल कॅटरिना