OMG : ...या कारणासाठी ​‘बाहुबली’ प्रभासने नाकारले विवाहांचे सहा हजार प्रस्ताव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2017 19:09 IST2017-05-04T13:39:40+5:302017-05-04T19:09:40+5:30

‘बाहुबली’मधून रातोरात सुपरस्टार बनलेला अभिनेता प्रभास याच्या फिल्मी करिअरबरोबरच त्याच्या खासगी आयुष्याविषयीच्या बातम्या दररोज समोर येत आहेत. आता अशीच ...

OMG: ... for this purpose 'Bahubali' Prabhu rejected six thousand proposals of marriages! | OMG : ...या कारणासाठी ​‘बाहुबली’ प्रभासने नाकारले विवाहांचे सहा हजार प्रस्ताव!

OMG : ...या कारणासाठी ​‘बाहुबली’ प्रभासने नाकारले विवाहांचे सहा हजार प्रस्ताव!

ाहुबली’मधून रातोरात सुपरस्टार बनलेला अभिनेता प्रभास याच्या फिल्मी करिअरबरोबरच त्याच्या खासगी आयुष्याविषयीच्या बातम्या दररोज समोर येत आहेत. आता अशीच एक बातमी समोर आली असून, निव्वळ ‘बाहुबली-२’साठी प्रभासने तब्बल सहा हजार विवाहाचे प्रस्ताव फेटाळले आहेत. विश्वास बसत नाही ना? पण हे खरे आहे. 

‘बाहुबली’मुळे इंडस्ट्रीतील तिन्ही खानमध्ये धडकी भरविणाºया प्रभासने आपल्या आयुष्यातील पाच वर्ष केवळ ‘बाहुबली’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये समर्पित केले. शूटिंगदरम्यान त्याला अनेक चित्रपट आणि जाहिरातींच्या आॅफर्स आल्या, मात्र त्याने केवळ ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली-२’ या चित्रपटाकडे फोकस केले. बॉलिवूडलाइफने दिलेल्या माहितीनुसार, प्रभासने त्याच्या विवाहाविषयीच्या चर्चेवर खुलासा केला. जेव्हा त्याला त्याच्या लग्नाच्या प्लॅनविषयी विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, ‘मी लग्न करणार होतो. केवळ दोनच महिन्यांसाठी मी लग्न पुढे ढकलले होते. कारण त्यावेळी मी शूटिंग करीत होतो; मात्र नंतर शूटिंगमध्ये असा काही गुंतत गेलो की, एकापाठोपाठ एक असे तब्बल सहा हजार विवाहाचे प्रस्ताव मी नाकारले. 



दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि त्यांचा बाहुबली अर्थात प्रभास या दोघांनीही चित्रपटा व्यतिरिक्त इतर कुठल्याच गोष्टीवर फोकस केले नव्हते. राजामौली यांनी तर प्रभासला इतर चित्रपटाचा विचारही करू नकोस असे बजावून सांगितले होते. कारण त्यांना आत्मविश्वास होता की, प्रभास जेव्हा पडद्यावर बाहुबलीच्या रूपात दिसणार तेव्हा तो लोकांचा सुपरस्टार बनणार. राजामौली यांचा हा आत्मविश्वास आता सत्यात उतरताना दिसत असून, प्रभास खºया अर्थाने प्रेक्षकांचा सुपरस्टार बनत असल्याचे दिसून येत आहे. 

या चित्रपटासाठी प्रभास एवढा सीरियस झाला होता की, त्याच्याकडे पैसेसुद्धा नव्हते. प्रभासने एका मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला होता. त्याने म्हटले होते की, शूटिंगदरम्यान माझ्याकडे पैसे नव्हते. एनटीव्ही तेलगूशी बोलताना प्रभासने सांगितले होते की, शूटिंगदरम्यान मला अनेक अ‍ॅडच्या आॅफर्स आल्या; मात्र मी त्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. यावेळी राजामौली यांनीदेखील म्हटले होते की, प्रभासकडे पैसे नसल्याने तो खूपच अस्वस्थ होता. त्यावेळी अनेक निर्माते त्याला पैसे देण्यास तयार होते, परंतु त्याने त्याचे पूर्ण लक्ष बाहुबलीवर केंद्रित केले होते. 



काही दिवसांपूर्वीच अशा बातम्या समोर आल्या होत्या की, प्रभास देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी हिच्या प्रेमात कैद झाला असून, लवकरच तो तिच्याशी विवाह करणार आहेत. परंतु या अफवा असल्याची माहिती आता समोर येत आहे. 

Web Title: OMG: ... for this purpose 'Bahubali' Prabhu rejected six thousand proposals of marriages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.