OMG : ‘कोसा’च्या शूटिंगदरम्यान जखमी झाली प्राची देसाई; स्वत:च करून घेतली दुखापत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 20:07 IST2017-08-16T14:27:36+5:302017-08-16T20:07:41+5:30

छोट्या पडद्यावरून करिअरला सुरुवात करीत मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री प्राची देसाई सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ...

OMG: Prachi Desai was injured during shooting of 'Kosa'; Hurt yourself! | OMG : ‘कोसा’च्या शूटिंगदरम्यान जखमी झाली प्राची देसाई; स्वत:च करून घेतली दुखापत!

OMG : ‘कोसा’च्या शूटिंगदरम्यान जखमी झाली प्राची देसाई; स्वत:च करून घेतली दुखापत!

ट्या पडद्यावरून करिअरला सुरुवात करीत मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री प्राची देसाई सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र प्राचीच्या फॅन्ससाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. होय, शूटिंगदरम्यान प्राचीचा अपघात झाला असून, त्यात ती जखमी झाली आहे. प्राची सध्या तिच्या आगामी ‘कोसा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगदरम्यान तिने स्वत:च तिच्या हाताला दुखापत करून घेतली आहे. 

वृत्तानुसार प्राचीला एका सीनमध्ये स्वत:ला रागात दाखविताना एका लाकडावर पंच मारायचा होता. सुरुवातीला प्राचीने हॅण्ड रॅप परिधान करून पंच मारला. मात्र यात ती व्यवस्थितरीत्या शॉट देऊ शकली नाही. त्यानंतर तिने हॅण्ड रॅप न घालताना लाकडाला पंच मारला. जेव्हा दिग्दर्शकांनी कट म्हटले तेव्हा लक्षात आले की, प्राचीच्या हाताला दुखापत झाली असून, प्राचीचा हात रक्तबंबाळ झाला आहे. प्राचीच्या मते, तिला हा सीन रिअल लूकसारखा करायचा होता. 



चित्रपटाच्या सेटवरील एका सूत्राने सांगितले की, सुरुवातीला प्राचीने बॉक्सिंग हॅण्ड रॅपचा वापर केला. मात्र त्यातून तिचे समाधान झाले नाही. त्यानंतर तिने हॅण्ड रॅपचा वापर न करताच शॉट देण्याचा निर्णय घेतला. दोन मिनिटांच्या लांबलचक सीननंतर दिग्दर्शकांनी कट असे म्हटले. मात्र तोपर्यंत प्राचीला खूपच दुखापत झाली होती. तिच्या हातातून रक्त वाहत होते. जेव्हा ही बाब दिग्दर्शकांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी तातडीने शूटिंग थांबवित प्राचीला उपचारासाठी पाठविले. 

गेल्या आठवड्यात झालेल्या या घटनेबद्दल प्राचीने एका वक्तव्यात म्हटले की, ‘कधी-कधी आपण एखाद्या भूमिकेत स्वत:ला वाहून घेतो, असेच काहीसे माझ्याबाबतीत घडले. हे खूपच त्रासदायक होते.’ प्राचीने याबाबतचे एक ट्विट केले असून, तिच्या चाहत्यांकडून तिला श्रद्धा सबुरीचा सल्ला दिला जात आहे. 

Web Title: OMG: Prachi Desai was injured during shooting of 'Kosa'; Hurt yourself!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.