OMG ! सुहाना खानच्या 60 हजार रुपयांच्या ड्रेसपेक्षा आर्यनच्या जॅकेटची किंमत ऐकाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 13:35 IST2017-07-08T05:51:07+5:302017-07-08T13:35:46+5:30

नुकतचे गौरी खानच्या नव्या रेस्टोरेंटचे ऑपनिंग करण्यात आले. यावेळी पिता शाहरुख खानसोबत मुलगी सुहाना हिने हजेरी लावत सगळ्यांचे लक्ष ...

OMG! Listening to the price of Aryan's jacket by Suhana Khan's Rs 60,000 dress | OMG ! सुहाना खानच्या 60 हजार रुपयांच्या ड्रेसपेक्षा आर्यनच्या जॅकेटची किंमत ऐकाच

OMG ! सुहाना खानच्या 60 हजार रुपयांच्या ड्रेसपेक्षा आर्यनच्या जॅकेटची किंमत ऐकाच

कतचे गौरी खानच्या नव्या रेस्टोरेंटचे ऑपनिंग करण्यात आले. यावेळी पिता शाहरुख खानसोबत मुलगी सुहाना हिने हजेरी लावत सगळ्यांचे लक्ष वेधले होते. यामागचे कारण होते सुहानाने यावेळी परिधान केलेल्या ड्रेसची किंमत जवळपास 60 हजार होती. म्हणजेच एखाद्या माणसाच्या महिन्याच्या पगारापेक्षा पण जास्त किंमतीचा ड्रेस तिने घातला होता. सुहानानंतर तिचा भाऊ आर्यन खान सध्या चर्चेत आला आहे. आर्यनचा डेनिम जॉकेट घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आर्यनच्या जॅकेटची किंमत सुहानाच्या ड्रेसपेक्षा पण जास्त असल्याचे समजते. आर्यनची जॅकेटची किंमत ऐकाल तर तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. तब्बल 88 हजार 755 रुपयांचे जॅकेट शाहरुखच्या मुलांने घातले आहे. ऐवढे महागडे किंमतीचे कपडे घालणाऱ्या शाहरुखच्या मुलांची महिन्याची पॉकेट मनी किती असेल याचा अंदाज बांधू शकतो. 




also read : Shocking : ​सुहाना खानच्या ‘या’ ड्रेसची किंमत जाणून व्हाल थक्क !

शाहरुख खान सध्या हैरी मेट सेजल या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. शाहरुख आणि अनुष्का शर्माचा हा चित्रपट 4 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. हैरी मेट सेजलचे प्रमोशन शाहरुख वेगळ्या पद्धतीने करतो आहे. शाहरुख चित्रपटाचा ट्रेलर एकत्र लाँच करण्याऐवजी तो वेगवेगळ्या पार्टमध्ये रिलीज केला. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित याचित्रपटाचे शूटिंग वेगवेगळ्या देशात झाले आहे. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. याचित्रपटाच्या माध्यमातून तिसऱ्यांदा अनुष्का आणि शाहरुख एकत्र काम करतायेत. हे दोघे याआधी 'रब ने बना दी जोडी' आणि जब तक है जान या चित्रपटात एकत्र झळकले होते.  

Web Title: OMG! Listening to the price of Aryan's jacket by Suhana Khan's Rs 60,000 dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.