​OMG !! कॅटरिना कैफ का कापतेयं अनुराग बासूचे केस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 14:06 IST2017-02-06T08:36:52+5:302017-02-06T14:06:52+5:30

ग्लॅमरस अ‍ॅण्ड ब्युटिफुल कॅटरिना कैफ सध्या काय करतेय? तर लोकांचे केस कापतेय. होय, वाचताय ते अगदी खरे आहे. कॅटरिना लोकांची हेअर स्टाईलिस्ट बनलीय. विश्वास बसत नाहीय? तर मग हा व्हिडिओ बघाच.

OMG !! Katrina Kaif kapatai Anurag Basu case? | ​OMG !! कॅटरिना कैफ का कापतेयं अनुराग बासूचे केस?

​OMG !! कॅटरिना कैफ का कापतेयं अनुराग बासूचे केस?

लॅमरस अ‍ॅण्ड ब्युटिफुल कॅटरिना कैफ सध्या काय करतेय? तर लोकांचे केस कापतेय. होय, वाचताय ते अगदी खरे आहे. कॅटरिना लोकांची हेअर स्टाईलिस्ट बनलीय. विश्वास बसत नाहीय? तर मग हा व्हिडिओ बघाच.

खरे तर कॅट सध्या अनुराग बासूच्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात व्यस्त आहे. पण या चित्रपटात कॅट केवळ अ‍ॅक्टिंगच करत नाहीयं, तर सेटवरच्या लोकांचे केसही कापते आहे. अलीकडे कॅटरिना सेटवर अनुरागची हेअरकट करताना दिसली. कॅटरिना केस कापतेय आणि अनुराग जोर जोराने ओरडतोयं, असा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. अनुरागने हा व्हिडिओ आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. कॅटरिना आता केवळ एकच गोष्ट या हेअरकटला वाचवू शकते, ती आहे ‘कवर’, असे कॅप्शन अनुरागने या व्हिडिओला दिले आहे. 

{{{{twitter_video_id####}}}}


‘जग्गा जासूस’ या चित्रपटात कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहेत. सोबतच गोविंदा, सायानी गुप्ता, अदा शर्मा हे कलाकारही महत्त्वाच्या रोलमध्ये आहेत. चित्रपटाची कथा एका युवा डिटेक्टिवबाबत आहे. हा डिटेक्टिव आपल्या हरवलेल्या पित्याच्या शोधात निघतो, अशी ही कथा आहे. रणबीर व कॅटरिनाच्या ब्रेकअपनंतर हा दोघांचा पहिला सिनेमा आहे. सध्या रणबीर व कॅटरिना कायम एकमेकांना टाळताना दिसतात. अशास्थितीत दोघे मिळून या चित्रपटाचे प्रमोशन करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कॅटरिना यापूर्वी ‘बार बार देखो’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाकडून कॅटला बºयाच अपेक्षा होत्या. पण बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट तितकाच दणकून आपटला. आता कॅटरिनाचा ‘जग्गा जासूस’ बॉक्सआॅफिसवर काय कमाल करतो, ते बघूयात. 
 
 ALSO READ : Jagga Jasoos : ‘जग्गा जासूस’ च्या सेटवर कॅटरिना कैफ का बसलीय चिंताग्रस्त?
​रणबीर कपूरच्या विरहात कॅटरिना कैफ झाली ‘शायर’!
 

Web Title: OMG !! Katrina Kaif kapatai Anurag Basu case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.