OMG!! अक्षयच्या ‘बेवफा पत्नी’चे गुपचूप शुभमंगल??
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2016 20:41 IST2016-08-23T15:09:11+5:302016-08-23T20:41:25+5:30
नुकत्याच रिलीज झालेल्या ‘रुस्तम’मध्ये ‘बेवफा पत्नी’ची भूमिका साकारून प्रसिद्धी झोतात आलेली इलियाना डिक्रूज सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ...

OMG!! अक्षयच्या ‘बेवफा पत्नी’चे गुपचूप शुभमंगल??
>नुकत्याच रिलीज झालेल्या ‘रुस्तम’मध्ये ‘बेवफा पत्नी’ची भूमिका साकारून प्रसिद्धी झोतात आलेली इलियाना डिक्रूज सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सध्या इलियाना तिचा खास मित्र अँड्र्यूनीबोन याच्यासोबत वेळ घालवताना दिसते आहे. या दोघांची अनेक छायाचित्रे त्यांचे नाते बरेच पुढे गेल्याची ग्वाही देणारे आहेत. खरे तर इलियानाने अँड्र्यूसोबतचे तिचे नाते कधीच लपवले नाही. पण यावेळी मात्र इलियाना काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताना दिसतेयं. होय, इलियाना व अँड्र्यू यांनी गुपचूप लग्न उरकल्याची बातमी आहे. दोघांनीही लग्न केल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अर्थात इलियानाने याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही. पण इलियाना व अँड्र्यूचे ताजे हातात हात घालून फिरतांनाचे फोटो बरेच काही सांगणारे आहेत. आता लग्न केल्याची बातमी किती खरी आणि किती खोटी हे इलियानाच जाणो!
![]()
![]()
![]()
![]()