OMG : आमिर खान अन् किरण रावला स्वाइन फ्लूची लागण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 22:41 IST2017-08-06T15:20:37+5:302017-08-06T22:41:55+5:30

राज्यात पुन्हा एकदा स्वाइन फ्लू या भयानक आजाराने डोके वर काढले असून, त्याची लागन आता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर ...

OMG: Aamir Khan and Kiran Rao swine flu infection! | OMG : आमिर खान अन् किरण रावला स्वाइन फ्लूची लागण!

OMG : आमिर खान अन् किरण रावला स्वाइन फ्लूची लागण!

ज्यात पुन्हा एकदा स्वाइन फ्लू या भयानक आजाराने डोके वर काढले असून, त्याची लागन आता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान यालाही झाली आहे. आमिरनेच याबाबतचा खुलासा केल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झालेल्या आमिरने त्याच्या अनुपस्थितीचे कारण स्वाइन फ्लू असल्याचे सांगितले. 'माझ्यासह पत्नी किरणला स्वाइन फ्लूची लागण झाल्याने आम्ही या सोहळ्याला उपस्थित राहू शकलो नाही, असा त्याने खुलासा केल्याने उपस्थितांना धक्काच बसला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी किरण राव दिसत होती. या कार्यक्रमासाठी आमिर आणि किरण उपस्थित राहणार होते. 

पुण्यातील बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये पाणी फाउंडेशनच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन केले होते. राज्यातील १३ जिल्ह्यांतील ३० तालुक्यांमधील तेराशेपेक्षा अधिक गावांमध्ये वॉटर कप स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेप्रसंगी आमिर आणि किरण या दाम्पत्यांनी हजेरी लावून लोकांमध्ये जनजागृती केली होती. दरम्यान, गेल्या आठवड्यातच आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव आगामी ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाच्या ट्रेलर लान्चसाठी उपस्थित होते. त्यावेळी आमिर एकदम फिट दिसत होता. मात्र अचानकच आमिरची प्रकृती बिघडल्याने त्याची लागन पत्नी किरणलाही झाली आहे. आमिर सध्या त्याच्या आगामी ‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्रचंड मेहनत घेत आहे.या चित्रपटासाठी त्याने नाक, कान टोचले आहेत. शिवाय तो सध्या वजनही कमी करीत आहे. 

दरम्यान, सोहळ्यात आमिर उपस्थित राहणार म्हणून समारंभाची जय्यत तयारी करण्यात आली होती. परंतु स्वाइन फ्लूची लागन झाल्याने त्याला समारंभात उपस्थित राहता आले नाही. समारंभासाठी रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता अतुल कुलकर्णी, शाहरूख खान आदी दिग्गज उपस्थित होते. या सोहळ्यासाठी आदल्या दिवसापासूनच राज्यातील कानाकोपºयातून नागरिक आले होते. मात्र त्या सगळ्यांनाच आमिरची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. जेव्हा आमिर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोहळ्यात सहभागी झाले तेव्हा उपस्थितांनी एकच जल्लोष केला. परंतु जेव्हा त्याने स्वाइन फ्लू या भयानक आजाराची लागन झाल्याचे सांगितले तेव्हा उपस्थितांना धक्का बसला. यावेळी त्याला उपस्थितांनी काळजी घेण्याचा सल्लाही दिला. 

Web Title: OMG: Aamir Khan and Kiran Rao swine flu infection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.