​ओम पुरींच्या डोक्याला खोल जखम, हाताला फ्रॅक्चर; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 15:30 IST2017-01-10T14:44:42+5:302017-01-10T15:30:45+5:30

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचा मृत्यू संशयाच्या भोवºयात सापडला आहे. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर हा संशय आणखी गडद झाला ...

Om Puri's head deep injuries, fracture on hand; Shocking revelations in the dissection report! | ​ओम पुरींच्या डोक्याला खोल जखम, हाताला फ्रॅक्चर; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासे !

​ओम पुरींच्या डोक्याला खोल जखम, हाताला फ्रॅक्चर; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासे !

येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचा मृत्यू संशयाच्या भोवºयात सापडला आहे. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर हा संशय आणखी गडद झाला आहे. होय, ओम पुरी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांच्या शवविच्छेदन अहवालानुसार, ओमपुरी यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याचे आणि मानेचे हाड तसेच डाव्या खांद्याला फ्रॅक्चर असल्याचे समोर आले आहे.  

ओम पुरी यांच्या निधनाबद्दल अनेक लोकांनी संशय बोलून दाखवला होता. गत शुक्रवारी ते आपल्या घरात मृतावस्थेत आढळले होते. ओशिवारा पोलिसांनी त्यांचा शवविच्छेदन अहवाल जारी केला. त्यानुसार, त्यांच्या डोक्याला सुमारे दीड इंच खोल व ४ सेंटीमीटर लांब जखम झाली होती. मेंदूत अनेक ठिकाणी रक्ताच्या गुठळ्या झा्ल्या होत्या. मानेचे हाड आणि डाव्या खांद्याला हेअरलाईन फ्रॅक्चर झाले होते. या शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी, त्यांच्या मृत्यूची वेगवेगळ्या दिशेने चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या बिल्डिंगचे विजिटर्स रजिस्टर आणि सीसीटीव्ही कॅमेरे जप्त करण्यात आले आहे. मृत्यूपूर्वी अखेरच्या २४ तासांत ओम पुरी ज्या लोकांना भेटले होते, त्यांचीही चौकशी केली जात आहे. तूर्तास पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

शनिवारी ओम पुरी यांचा ड्रायव्हर राम प्रमोद मिश्रा आणि प्रोड्यूसर खालिद किडवई यांना समोरा-समोर बसवून तीन तास चौकशी करण्यात आली. ओम पुरींची डेड बॉडी बघणारा प्रमोद मिश्रा पहिला होता. मृत्यूच्या आदल्या रात्री मिश्रा यानेच ओम पुरींना घरी सोडले होते.
त्याने सांगितल्यानुसार,गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास ओम पुरी यांना अ‍ॅम्बेसीला जायचे होते. साडे सात वाजता ते निघाले. यावेळी निमार्ते खालिद किदवई त्यांच्यासोबत होते. शुक्रवार सकाळी 6.30 वाजता खालिद यांचा मला फोन आला. ते म्हणाले पुरी यांची पर्स त्यांच्या (खालिद यांच्या) कारमध्ये राहिली आहे.साहेबांनी (ओम पुरी) मला त्यांना सकाळी उठवायला सांगितले होते. सकाळी 7 वाजता मी त्यांच्या फ्लॅटवर पोहोचले. खूप वेळा दार वाजवले, पण कुणीही दार उघडले नाही. साहेबांनी त्यांच्या फ्लॅटची एकचावी शेजा-यांकडे ठेवली होती. शेजा-यांच्या मदतीने मी दार उघडले. टीव्ही आणि एसी चालू होता. ते किचनमध्ये पडले होते.ते विवस्त्र होते. डोक्यावर जखम होती. मी तातडीने काही लोकांना फोन केला आणि अ‍ॅम्बूलन्स मागवली.

ओम पुरींसोबत काम करणा-या लोकांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून ते प्रचंड चिंताग्रस्त होते. आपल्या कौटुंबिक कलहामुळे ते चिंतेत होते. त्यांच्या एका जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ५ जानेवारीच्या दुपारपासून रात्री उशीरापर्यंत ते सलग नशेत होते. यावेळी रिलीजसाठी तयार असलेल्या ‘रामभजन जिंदाबाद’ या चित्रपटाची टीम त्यांच्यासोबत होती. ओम पुरी अंधेरीतील निवासस्थानी एकटेच राहत होते. त्यांना कथितरित्या दुस-यांदा ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. शुक्रवारी सकाळी काही कामानिमित्त त्यांना बाहेर नेण्यासाठी आलेल्या त्यांच्या वाहनचालकाला पहिल्यांदा त्यांचे निधन झाल्याचे लक्षात आले. दरम्यान, त्यांच्या शरीरावर काही जखमाही आढळून आल्याने संशय निर्माण झाला. यावरुन तर्कवितर्कांनाही उधाण आले असून शवविच्छेदन अहवालामधील फ्रॅक्चर आणि डोकाल्या झालेली गंभीर दुखापतींचा काय निष्कर्ष लागणार हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होईल.  

Web Title: Om Puri's head deep injuries, fracture on hand; Shocking revelations in the dissection report!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.