पाकिस्तानच्या कुरापतींनंतर व्हायरल होतोय ओम पुरी यांचा 'लक्ष्य' सिनेमातील डायलॉग, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 12:43 IST2025-05-12T12:42:55+5:302025-05-12T12:43:24+5:30
Om Puri : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली. मात्र पाकिस्तानने युद्धबंदीचं घोर उल्लंघन केल्याच्या बातम्या आल्यानंतर ओम पुरी यांचा लक्ष्य सिनेमातील एक संवाद व्हायरल होतो आहे.

पाकिस्तानच्या कुरापतींनंतर व्हायरल होतोय ओम पुरी यांचा 'लक्ष्य' सिनेमातील डायलॉग, पाहा व्हिडीओ
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली आणि ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)च्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. तिथले ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तान संतापला आणि त्याने ड्रोनने भारतातील अनेक भागांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, जो आपल्या जवानांनी हाणून पाडले. दोन्ही देशांदरम्यान युद्धबंदी जाहीर झाली असली तरी, पाकिस्तानने आपले खरे रंग दाखवले आणि हा करार मोडला आणि पुन्हा भारतावर गोळीबार केला.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर, पाकिस्तानने आपले खरे रूप दाखवले आणि करार मोडला. दरम्यान, भारतातील लोकांना ओम पुरी यांचा 'लक्ष्य' चित्रपट आठवू लागला. या चित्रपटात अमिताभ बच्चन, हृतिक रोशन आणि प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात ओम पुरी सुभेदार मेजर प्रीतम सिंग यांच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटातील एका सीनमध्ये ओम पुरी हृतिक रोशनला सल्ला देताना दिसत आहेत.
व्हायरल होतोय ओम पुरी यांचा डायलॉग
'लक्ष्य' चित्रपटात ओम पुरी यांनी हृतिक रोशनला पाकिस्तानबद्दल सांगितले होते की, मला त्यांचा खूप चांगला अनुभव आहे. जर पाकिस्तान हरला तर तो पुन्हा परत येतो. जर तुम्ही जिंकलात तर लगेच बेफिकीर होऊ नका. माझी ही गोष्ट लक्षात ठेवा. (मुझे उन लोगों का काफी तजुर्बा है. पाकिस्तान अगर हारता है तो पलटकर एक बार फिर आता है. अगर तुम जीत जाओ तो फौरन लापरवाह मत हो जाना. मेरी ये बात जरूर याद रखना.)
Om Puri was always right about these Pakistani and Pakistan #IndiaPakistanWar#Ceasefire#ceasefirevoilationpic.twitter.com/0HCu4PaRLS
— Vishal (@VishalMalvi_) May 10, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर, ओम पुरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्रेंड करत आहेत. यावर अनेक युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने म्हटले की, ओम पुरींचा हा सल्ला पूर्णपणे बरोबर असल्याचे सिद्ध होत आहे.