दिल्ली फिल्मोत्सवमध्ये दिली जाणार ओम पुरींना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2017 17:08 IST2017-01-17T17:08:50+5:302017-01-17T17:08:50+5:30

भारतीय पॅनोरमा फिल्मोत्सवाची सोमवारी सुरूवात झाली. ओम पुरींना त्यांच्या पाच चित्रपटांचे स्क्रीनिंग करून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. १७ ...

Om Puri to pay tribute to Delhi film festival | दिल्ली फिल्मोत्सवमध्ये दिली जाणार ओम पुरींना श्रद्धांजली

दिल्ली फिल्मोत्सवमध्ये दिली जाणार ओम पुरींना श्रद्धांजली

रतीय पॅनोरमा फिल्मोत्सवाची सोमवारी सुरूवात झाली. ओम पुरींना त्यांच्या पाच चित्रपटांचे स्क्रीनिंग करून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. १७ ते २१ जानेवारी या काळात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ओम पुरी यांचे अर्धसत्य, मिर्च मसाला, जाने दो भी यारो, सद्गती आणि धारावी हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी या फिल्मोत्सवाचे उद्घाटन केले. ओम पुरी यांच्या कामाचे कौतुक करताना राठोड यांनी एका चित्रपट निर्मात्याने त्यांना ओम पुरी यांच्या कार्याच्या दिलेल्या माहितीबद्दल सांगितले. चित्रपटासंदर्भातील त्यांची कामाची सचोटी वाखाणण्याजोगी होती, असेही ते म्हणाले.
या महोत्सवात २६ चित्रपट आणि २१ इतर लघुचित्रपट पाहता येतील. सीरी फोर्ट आॅडिटोरियममध्ये हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. मणिपुरी लघुपट इमा सावित्री या चित्रपटापासून याची सुरूवात झाली. 
या महोत्सवात सैराट, सुल्तान, नटसम्राट, बाजीराव मस्तानी हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

Web Title: Om Puri to pay tribute to Delhi film festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.