‘ओके जानू’ कपलने का केला ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’ एपिसोड कॅन्सल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 12:36 IST2016-12-20T12:36:21+5:302016-12-20T12:36:21+5:30

‘आशिकी २’ कपल आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे दोघे सध्या ‘ओके जानू’ मुळे सध्या चर्चेत आहेत. ‘ओके ...

'Oke Janu' Kapla Kaya Kiya 'Save Comedy Nights' Episode Cancel? | ‘ओके जानू’ कपलने का केला ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’ एपिसोड कॅन्सल?

‘ओके जानू’ कपलने का केला ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’ एपिसोड कॅन्सल?

शिकी २’ कपल आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे दोघे सध्या ‘ओके जानू’ मुळे सध्या चर्चेत आहेत. ‘ओके जानू’च्या प्रमोशनमध्ये हे कपल सध्या व्यस्त आहे. अलीकडे दोघेही ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’ या प्रमोशनल शोच्या शूटसाठी जाणार होते. पण, श्रद्धा कपूरच्या ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आला आणि तिने या एपिसोडचे शूटिंग करण्यास नकार दिला. ड्रायव्हरच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी तिने तिच्या सर्व कमिटमेंट्स कॅन्सल केल्या असल्याचे कळतेय.

सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, श्रद्धाने नकार दिल्यानंतर आदित्य रॉय कपूर एकटा ‘कॉमेडी नाईटस बचाओ’च्या शूटसाठी तयार होता पण, चॅनेलला हे ‘आशिकी कपल’ एकत्रच शोसाठी हवे होते. त्यामुळे ‘नो सोलो स्पेशल अ‍ॅपिअरन्सेस’ म्हणत चॅनेलनेही आदित्यला नाकारले. आता या दोघांसह हा शो केव्हा शूट होणार हे अद्याप कळू शकलेले नाहीये. मात्र, ‘बचाओ टीम’ आता सलमान आणि रिअ‍ॅलिटी शोच्या एपिसोड शूटिंगसाठी लोणावळ्याला जाणार आहे. यावेळेचा एपिसोड एक तासाचा नसून तो दोन तासांचा असणार आहे.’ 

आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे कपल ‘आशिकी २’ नंतर ‘ओके जानू’ मधून चाहत्यांच्या भेटीला येतेय. शाद अली दिग्दर्शित हा चित्रपट तामिळ ब्लॉकबस्टर ‘ओके कन्मनी’चा हिंदी रिमेक असल्याने केव्हा रिलीज होणार अशी उत्सुकता सर्वांनाच लागलीयं. आदित्य व श्रद्धा या दोघांमधील आॅनस्क्रीन  केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक आतूर आहेत. नुकतेच चित्रपटातील ‘हम्मा हम्मा’ हे गाणं लाँच करण्यात आले आहे. या गाण्याला यूट्यूबवर शेकडो लाईक्स मिळाले आहेत.

Web Title: 'Oke Janu' Kapla Kaya Kiya 'Save Comedy Nights' Episode Cancel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.