official statement: ​विनोद खन्ना यांची प्रकृती सामान्य, अफवांवर विश्वास ठेऊ नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 09:54 IST2017-04-07T04:22:37+5:302017-04-07T09:54:58+5:30

अभिनेता विनोद खन्ना यांना गत शुक्रवारी शरिरातील पाणी कमी झाल्यामुळे रूग्णालयात भरती करण्यात आले होते. काल विनोद खन्ना यांचा ...

Official statement: Vinod Khanna should not believe in general, rumors | official statement: ​विनोद खन्ना यांची प्रकृती सामान्य, अफवांवर विश्वास ठेऊ नये

official statement: ​विनोद खन्ना यांची प्रकृती सामान्य, अफवांवर विश्वास ठेऊ नये

िनेता विनोद खन्ना यांना गत शुक्रवारी शरिरातील पाणी कमी झाल्यामुळे रूग्णालयात भरती करण्यात आले होते. काल विनोद खन्ना यांचा अतिशय खंगलेल्या अवस्थेतील फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. यानंतर विनोद खन्ना ब्लॅडर कॅन्सरने ग्रस्त असल्याची चर्चा रंगली. पण खुद्द विनोद खन्ना यांचा मुलगा राहुल याने मात्र ही चर्चा धुडकावून लावली आहे. डॅडला शुक्रवारी डिहाड्रेशनमुळे रूग्णालयात भरती करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. रूग्णालयातून त्यांना लवकरच सुटी मिळले. रूग्णालयाने त्यांची इतक्या प्रेमाने देखभाल केली, त्याबद्दल आमचे कुटुंब आभारी आहे, असे राहुलने म्हटले आहे.



एचएन रिलायन्स रूग्णालयाच्या प्रवक्त्यानेही एक हेल्थ बुलेटिन जारी करून विनोद खन्ना यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे.  त्यांच्या प्रकृतीबाबत बºयाच अफवा उठत आहेत. कृपया या अफवांवर विश्वास ठेऊ नये. मीडियानेही अफवांवर विश्वास ठेवणे टाळावे. त्यांची प्रकृती सामान्य आहे. काहीही गंभीर नसून घाबरण्याचे काहीही कारण नाही, असे प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
  काल विनोद खन्ना यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. कारण या फोटोतील विनोद खन्ना यांना ओळखणेही कठीण होते. आजारापणाने ते अगदी खंगून गेलेले या फोटोत दिसत होते. या फोटोसोबतच विनोद खन्ना ब्लॅडर कॅन्सरने ग्रस्त असल्याच्या बातम्या उठल्या.अर्थात अद्याप विनोद खन्ना यांचे कुटुंबीय वा रूग्णालयाने याला दुजोरा दिलेला नाही. आता तर रूग्णालयानेच या सगळ्या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. विनोद खन्ना यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच ही समाधानाची बाब आहे.

Web Title: Official statement: Vinod Khanna should not believe in general, rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.