OMG! नूतन यांनी चारचौघात मारली होती संजीव कुमार यांच्या कानाखाली, वाचा काय आहे हे प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 06:00 IST2021-06-04T06:00:00+5:302021-06-04T06:00:05+5:30

नूतन आणि संजीव कुमार यांचा एक किस्सा प्रचंड फेमस आहे.

Nutan Birthday Special : OMG!When Nutan slapped Sanjeev Kumar's in front of everyone | OMG! नूतन यांनी चारचौघात मारली होती संजीव कुमार यांच्या कानाखाली, वाचा काय आहे हे प्रकरण

OMG! नूतन यांनी चारचौघात मारली होती संजीव कुमार यांच्या कानाखाली, वाचा काय आहे हे प्रकरण

ठळक मुद्देनूतन यांच्यासोबत काम करताना संजीव कुमार त्यांच्या प्रेमात पडले होते. नुतन यांना त्यांनी लग्नाची मागणीही घातली होती. त्यावेळी नुतन यांचे लग्न झालेले होते.

नूतन यांचा आज वाढदिवस असून त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. नूतन यांनी खूपच कमी वयात बॉलिवूडमधील त्यांच्या करियरला सुरुवात केली होती. त्यांनी केवळ वयाच्या १४ व्या वर्षी हमारी बेटी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमधील त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

नूतन यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

नूतन आणि संजीव कुमार यांचा एक किस्सा प्रचंड फेमस आहे. नूतन यांच्यासोबत काम करताना संजीव कुमार त्यांच्या प्रेमात पडले होते. नुतन यांना त्यांनी लग्नाची मागणीही घातली होती. त्यावेळी नुतन यांचे लग्न झालेले होते. त्यामुळे त्या संजीव कुमार यांच्याकडे दुर्लक्ष करत होत्या. पण नूतन आणि संजीव कुमार यांच्या अफेअरची चर्चा त्याकाळात मीडियात चांगलीच रंगली होती. नूतन आणि त्यांचे प्रेमप्रकरण सुरू असल्याचे प्रसारमाध्यमांमध्ये संजीव कुमार यांनीच पसरवले असल्याचे नूतन यांना वाटत होते. त्यामुळे नूतन यांनी चिडून चारचौघांमध्ये त्यांच्या कानाखाली मारली होती.

Web Title: Nutan Birthday Special : OMG!When Nutan slapped Sanjeev Kumar's in front of everyone

टॅग्स :Nutanनुतन