क्रिती सॅननच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या ६० लाख!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 13:52 IST2017-03-18T08:20:48+5:302017-03-18T13:52:02+5:30

​अभिनेत्री क्रिती सॅनन हिच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या सहा मिलियन म्हणजेच ६० लाखांपेक्षा अधिक झाली आहे.

Number of followers on Kasti Sanan's Instagram! | क्रिती सॅननच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या ६० लाख!!

क्रिती सॅननच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या ६० लाख!!

िनेत्री क्रिती सॅनन हिच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या सहा मिलियन म्हणजेच ६० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. याविषयी क्रितीने म्हटले की, सोशल मीडियावर परिवारामुळे मला आनंद होतो. गेल्या शुक्रवारी स्वत:चा एक फोटो शेअर करताना क्रितीने लिहिले की, ‘इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या वाचून खूप छान वाटत आहे. धन्यवाद!’

तसेच यावेळी क्रितीने तिच्या फॅन्सचे जाहीर आभारही मानले. तुमच्यामुळेच माझे हास्य खुलत असल्याचे ती म्हणाली. क्रितीने दिग्दर्शक सब्बीर खान यांच्या ‘हिरोपंती’ या सिनेमात बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. या सिनेमात अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत होता. त्याचबरोबर २०१५ मध्ये आलेल्या ‘दिलवाले’ या सिनेमातही क्रिती महत्त्वपूर्ण भूमिकेत बघावयास मिळाली. सिनेमात तिच्याबरोबर सुपरस्टार शाहरूख खान आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 
">http://

दरम्यान, क्रिती सध्या तिच्या आगामी ‘रब्बा’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमात ती सुशांत सिंह राजपूत याच्याबरोबर दिसणार आहे. याव्यतिरिक्त क्रिती ‘बरेली कि बर्फी’ या सिनेमातही अभिनेता आयुष्यमान खुराणा आणि राजकुमार राव यांच्याबरोबर दिसणार आहे. 

सध्या क्रिती जरी तिच्या सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असली तरी, सोशल मीडियावर वाढत्या लोकप्रियमुळे सध्या ती खूश आहे. त्यामुळे कितीही व्यस्त शेड्यूल्ड असले तरी ती वेळात वेळ काढून तिच्या फॅन्सशी कनेक्ट असते. तिच्या आगामी सिनेमांच्या अपडेटपासून ते सुंदर फोटो अपलोड करण्यासाठी क्रितीला ओळखले जाते. कदाचित याच कारणामुळे तिची फॅन्स संख्या वाढत असावी. 

Web Title: Number of followers on Kasti Sanan's Instagram!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.