आता सिद्धार्थ मिळवून देणार घटस्फोट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 18:22 IST2016-08-22T12:52:04+5:302016-08-22T18:22:58+5:30
शीर्षक वाचून दचकलात ना? पण दचकू नका...बातमी काय, ते आम्ही तुम्हाला सांगतोय...

आता सिद्धार्थ मिळवून देणार घटस्फोट?
श र्षक वाचून दचकलात ना? पण दचकू नका...बातमी काय, ते आम्ही तुम्हाला सांगतोय. सिद्धार्थ मल्होत्रा, करण जोहर, कॅटरिना कैफ, आलिया भट्ट, परिणीती चोप्रा , वरूण धवन आणि आदित्य रॉय कपूर ही अख्खी टीम सध्या ‘ड्रिम टीम टूर’निमित्त अमेरिकेत आहे, हे तुम्ही जाणताच. न्यू जर्सी येथे प्रवास करीत असताना सिद्धार्थची नजर एका जाहिरातीच्या एका फलकावर गेली. ‘Divorce $399…Spouse signature not needed’,असे या फलकावर लिहिलेले होते. ही जाहिरात वाचून सिद्धार्थला राहावले नाही आणि त्याने या जाहिरातीच्या फलकाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला...तेही "Best offer at best price ! Hurry!" या कॅप्शनसह. आहे ना गंमत!!