आता पाकिस्तानातील ‘या’ सलमानने म्हटले मलाही तुरुंगात टाका, व्हिडीओ झाला व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 18:49 IST2018-04-06T13:19:22+5:302018-04-06T18:49:58+5:30

पाकिस्तानात असलेल्या सलमानच्या डुप्लिेकटचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये त्याने मलाही जेलमध्ये टाका असे म्हटले आहे.

Now this 'Salman' in Pakistan asked me to go to prison, video got viral! | आता पाकिस्तानातील ‘या’ सलमानने म्हटले मलाही तुरुंगात टाका, व्हिडीओ झाला व्हायरल!

आता पाकिस्तानातील ‘या’ सलमानने म्हटले मलाही तुरुंगात टाका, व्हिडीओ झाला व्हायरल!

मान खानला पाच वर्षांची शिक्षा झाल्याचे समोर आल्यानंतर पाकिस्तानातील सलमानच्या डुप्लिकेटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल होत आहे. वास्तविक हा व्हिडीओ आताचा नसून तेव्हाचा आहे जेव्हा मुंबई सेशन कोर्टाने ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणी सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही बातमी ऐकताच पाकिस्तानात राहणारा सलमानचा डुप्लिकेट हुसनैन सलीम खूप दु:खी झाला होता. त्यावेळी त्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. आता हाच व्हिडीओ पुन्हा एकदा सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हुसनैन म्हणतो की, ‘मलादेखील जेलमध्ये टाका, मला त्याचे दु:ख बघवत नाही. मीदेखील त्याच्याप्रमाणे त्रास सहन करण्यास तयार आहे. यानंतर तो जेल कोठडीच्या दरवाजावरील गजांवर आपले डोके आदळताना दिसतो. 



सियालकोट येथे २५ डिसेंबर १९८५ रोजी हुसनैन सलीमचा जन्म झाला, तर सलमानचा जन्म २७ डिसेंबर १९६५ रोजी झाला. दोघांच्या जन्मतारखेत केवळ दोन दिवसांचे अंतर आहे. विशेष म्हणजे, दोघांची रासही एकच आहे. योगायोगाची बाब म्हणजे हुसनैनच्या वडिलांचे नावही सलीम आहे. इस्लामाबाद येथे ते एक डिपार्टमेंटल स्टोअर चालवितात. त्यांच्या स्टोअरमध्ये नेहमीच ग्राहकांची गर्दी असते. 



एका मुलाखतीत हुसनैनने सांगितले होते की, जेव्हा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी शाळेत शिकत होतो. चित्रपट बघितल्यानंतर माझ्या परिवारातील लोक म्हणत होते की, आपल्या मुलाचे डोळे सलमानच्या डोळ्यांशी खूपच मिळतेजुळते आहेत. पुढे हळूहळू शाळा आणि कॉलेजमध्ये सलमान खानच्या या डुप्लिकेटची लोकप्रियता वाढत गेली. सलमानची मिमिक्री, त्याच्याप्रमाणे डान्स करण्याच्या स्टाइलमुळे त्याला जाहिरातीच्या आॅफर्सही मिळत गेल्या. 







त्याने त्याच्या फेसबुक पेजवर बरेचसे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो सलमानच्या पोज कॉपी करताना दिसत आहे. 

Web Title: Now this 'Salman' in Pakistan asked me to go to prison, video got viral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.