अबब!! रणवीर हे लगेज तुझे की सर्वांचे!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 20:02 IST2016-08-11T14:28:22+5:302016-08-11T20:02:17+5:30
रणवीर सिंह म्हणजे वेगळेच रसायन. चर्चेत राहायला त्याला काहीही कारण लागत नाही. रणवीर जे काही करेल, ती बातमी होते. ...

अबब!! रणवीर हे लगेज तुझे की सर्वांचे!!
र वीर सिंह म्हणजे वेगळेच रसायन. चर्चेत राहायला त्याला काहीही कारण लागत नाही. रणवीर जे काही करेल, ती बातमी होते. आता रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा फोटोच बघा ना! रणवीरचा हा फोटो आहे युरोपमधला. एका जाहिरातीच्या शूटींगसाठी रणवीर युरोपात होता. शूटींग संपवून परतांनाचा एक फोटो रणवीरने पोस्ट केला आहे. ट्रालीवर लादलेले भलेमोठे लगेज आणि या लगेजवर बसलेला रणवीर, असा हा फोटो आणि त्याला रणवीरने दिलेले कॅप्शन वाचून तुम्हालाही क्षणभर हसू येईल.‘I prefer to travel light’ असे कॅप्शन रणवीरने या फोटोला दिले आहे. कॅप्शन मजेशीर आहेच. कारण रणवीर सुटकेसच्या ढिगावर बसला आहे. आता हे रणवीरचे एकट्याचे सामान आहे की अनेकांचे हे कळायला मार्ग नाही. कदाचित रणवीर दर तासाला कपडे बदलत असावा किंवा मग आपल्या ‘लेडी लव्ह’साठी त्याने केलेले हे शॉपिंग असेल. तुम्हाला काय वाटते??
![]()