आता ‘ही’ अभिनेत्री पतीविनाच जाणार हनीमूनला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 17:58 IST2017-09-28T12:28:46+5:302017-09-28T17:58:46+5:30
सध्या साउथमध्ये कंगना राणौतच्या ‘क्वीन’ या चित्रपटावरून चांगलीच चर्चा रंगत आहे. कारण साउथचे दिग्दर्शक ‘क्वीन’ या चित्रपटाचे यश कॅच ...

आता ‘ही’ अभिनेत्री पतीविनाच जाणार हनीमूनला!
स ्या साउथमध्ये कंगना राणौतच्या ‘क्वीन’ या चित्रपटावरून चांगलीच चर्चा रंगत आहे. कारण साउथचे दिग्दर्शक ‘क्वीन’ या चित्रपटाचे यश कॅच करण्याचा प्रयत्न करीत आहेत. होय, ‘क्वीन’ची आता तेलगुमध्ये निर्मिती केली जात असून, यामध्ये कोणती अभिनेत्री कंगनाचे पात्र स्वीकारेल यावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. वास्तविक सुरुवातीला अभिनेत्री तमन्ना भाटियाचे नाव फायनल झाले होते. परंतु आता काजल अग्रवाल या अभिनेत्रीचे नाव या भूमिकेसाठी निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आता काजल पतीविना हनीमूनला जाणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचा कन्नड आणि मल्याळममध्ये रिमेक येणार असून, त्यासाठीही अभिनेत्रींची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
काजलने साउथबरोबरच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली. तिने ‘सिंघम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. तिचा पहिलाच चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला. त्यानंतर ती अक्षयकुमारसोबत ‘स्पेशल २६’मध्ये झळकली. पुढे ती अभिनेता रणदीप हुड्डाबरोबर ‘दो लफ्जो की कहानी’ या चित्रपटात बघावयास मिळाली. तिचा हा चित्रपट फारसा चालला नाही. दरम्यान काजल पुन्हा एकदा साउथमध्ये परतली असून, ती क्वीनच्या रिमेकमधून धमाकेदार एंट्री करण्याची शक्यता आहे. तामिळमध्ये या चित्रपटाचे नाव ‘पेरिस पेरिस’ असणार आहे. चित्रपटाला रमेश अरविंद दिग्दर्शित करणार आहेत.
![]()
साउथची हिट मशीन समजली जाणारी काजल पतीविना हनीमूनला जाताना बघायला प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे. चित्रपटाच्या यशाविषयी सांगायचे झाल्यास कंगनाच्या ‘क्वीन’ने बॉक्स आॅफिसवर चांगला जलवा दाखविला होता. चित्रपटाने कमाईच्या बाबतीतही अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. शिवाय कंगनाला ‘क्वीन’चा दर्जाही मिळवून दिला. आता काजलच्या ‘पेरिस पेरिस’कडून अशाप्रकारची अपेक्षा ठेवली जात आहे.