​आता ‘ट्यूबलाईट’ची ‘माया’ दिसणार सैफ अली खानसोबत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2017 15:48 IST2017-06-26T10:18:49+5:302017-06-26T15:48:49+5:30

‘ट्यूबलाईट’ या चित्रपटात कॅमिओ करून प्रकाशझोतात आलेली ईशा तलवार आणखी एका बॉलिवूड प्रोजेक्टसाठी तयार आहे. होय, ‘ट्यूबलाईट’मध्ये ईशाने माया ...

Now with the 'Maya' of 'Tubulite' Saif Ali Khan! | ​आता ‘ट्यूबलाईट’ची ‘माया’ दिसणार सैफ अली खानसोबत!

​आता ‘ट्यूबलाईट’ची ‘माया’ दिसणार सैफ अली खानसोबत!

्यूबलाईट’ या चित्रपटात कॅमिओ करून प्रकाशझोतात आलेली ईशा तलवार आणखी एका बॉलिवूड प्रोजेक्टसाठी तयार आहे. होय, ‘ट्यूबलाईट’मध्ये ईशाने माया नामक व्यक्तिरेखा साकारली आहे. ती ओम पुरीच्या आश्रमात काम करत असते आणि लक्ष्मण (सलमान खान) व भरतच्या (सोहेल खान) अतिशय जवळ असते. ईशा बॉलिवूडसाठी नवीन असली तरी साऊथमध्ये ती एक लोकप्रीय चेहरा आहे. ‘हमारा दिल आपके पास है’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केले होते. लवकरच ईशा सैफ अली खानसोबत ‘कालाकंडी’ या चित्रपटात दिसणार आहे. अक्षत वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात ईशा सैफच्या अपोझिट दिसणार आहे. या चित्रपटात ती एका शहरी मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे.
याबाबत ईशाने सांगितले की, ‘काला कंडी’ एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. हा चित्रपट दोन वर्षांपूर्वीच येणार होता. त्यावेळी मला दुसरी भूमिका आॅफर केली गेली होती. अलीकडे हा चित्रपट पुन्हा करायचे ठरले तेव्हा मला नवा रोल आॅफर केला गेला. पण मी अक्षतला तोच जुना रोल हवा म्हणून गळ घातली आणि अक्षतनेही मला तो रोल दिला. मी नशीबवान आहे की, मला हा चित्रपट मिळाला. ‘ट्यूबलाईट’साठी मी आॅडिशन दिले होते. यानंतर कुठे मला मायाची भूमिका मिळाली.
‘ट्यूबलाईट’मधली साधी-भोळी ईशा इन्स्टाग्रामवर बरीच अ‍ॅक्टिव्ह राहते. मॉडेलिंगमध्ये करिअर सुरु करणाºया ईशाने सुमारे ४० जाहिरातीत काम केले आहे. ईशाचे वडील बोनी कपूरच्या कंपनीत डायरेक्टर व एक्झिक्युटीव्ह प्रोड्यूसर म्हणून काम करतात. ईशाने अनेक साऊथ चित्रपटांत काम केलेय.

Web Title: Now with the 'Maya' of 'Tubulite' Saif Ali Khan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.