आता केआरकेने सुपरस्टर रजनीकांत आणि मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानशी घेतला पंगा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 14:18 IST2017-10-12T08:48:16+5:302017-10-12T14:18:23+5:30
स्वयंघोषित क्रिटिक कमाल राशिद खान हा नेहमीच त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. ट्विटच्या माध्यमांतून तो इंडस्ट्रीतील मोठमोठ्या सुपरस्टार्सबरोबर पंगा घेत ...
.jpg)
आता केआरकेने सुपरस्टर रजनीकांत आणि मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानशी घेतला पंगा!
स वयंघोषित क्रिटिक कमाल राशिद खान हा नेहमीच त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. ट्विटच्या माध्यमांतून तो इंडस्ट्रीतील मोठमोठ्या सुपरस्टार्सबरोबर पंगा घेत असतो. आता त्याने पुन्हा एकदा असाच काहीसा कारनामा केला आहे. होय, कमालने एका मुलाखतीत आगामी मोठ्या प्रॉडक्शन हाउसच्या चित्रपटांबद्दल भविष्यवाणी केली आहे. त्यामध्ये ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान, इत्तेफाक-२, सीक्रेट सुपरस्टार आणि पद्मावती’ या चित्रपटांचा समावेश आहे. हे चित्रपट बॉक्स आॅफिसवर किती कमाई करणार याची भविष्यवाणीच कमालने केली आहे. त्याचबरोबर त्याने चक्क सुपरस्टर रजनीकांत आणि मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान यांच्याशी पंगाही घेतला आहे.
कमालने केलेल्या भविष्यवाणीनुसार, दीपिका पादुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग स्टारर ‘पद्मावती’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुमारे दोनशे कोटी रुपयांची कमाई करणार आहे. यावेळी कमालला विचारण्यात आले की, या चित्रपटाला करणी सेनेकडून विरोध केला जात आहे, अशातही चित्रपट दोनशे कोटींचा आकडा गाठू शकणार काय? तर यावर उत्तर देताना कमालने म्हटले की, ‘राजस्थान हे खूपच लहान राज्य आहे. त्यामुळे या भागात करणी सेनेकडून विरोध झाला तरी, देशातील इतर भागांत चित्रपट चांगला गल्ला जमविणार आहे. त्यामुळे करणी सेनेचा यावर फारसा प्रभाव पडेल असे मला वाटत नाही.
‘पद्मावती’ व्यतिरिक्त केआरकेने मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान याच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटाबद्दलही भविष्यवाणी केली. त्याने म्हटले की, हा चित्रपट कमीत कमी २५० कोटी रुपयांचे कलेक्शन करण्यात यशस्वी होईल. तर सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘२.०’बद्दल काहीही भविष्यवाणी करण्यास केआरकेने स्पष्ट शब्दात नकार दिला. तसेच असेही म्हटले की, मी हा चित्रपट बघायला जाणार नाही तसेच चित्रपटाबद्दल प्रडिक्शनही करणार नाही. मात्र केआरके असे का म्हणतो हे मात्र त्याने सांगितले नाही.
‘इत्तेफाक’बद्दल बोलताना केआरकेने म्हटले की, हा चित्रपट कमीत कमी ३० कोटी रुपये कमविणार आहे. त्यापेक्षा अधिक हा चित्रपट झेप मारूच शकत नाही. तर ‘सीके्रट सुपरस्टार’बद्दल त्याने केलेली भविष्यवाणी ही धक्कादायक म्हणावी लागेल. कारण केआरकेच्या मते हा चित्रपट केवळ सात कोटी रुपये कमविणार असून, बॉक्स आॅफिसवर सपशेल फ्लॉप होणार आहे. त्यामुळे यावेळेस केआरकेने रजनीकांत आणि आमिर खान यांच्याशी पंगा घेतल्याची चर्चा आहे.

}}}} ">.@kamaalrkhan PREDICTS box office collections of future bollywood films -#Padmavati#GolmaalAgain#2Point0#TalkingFilms#KRKKaHungamapic.twitter.com/fTpf4K7rfo— Bollywood Hungama (@Bollyhungama) October 10, 2017
.@kamaalrkhan PREDICTS box office collections of future bollywood films -#Padmavati#GolmaalAgain#2Point0#TalkingFilms#KRKKaHungamapic.twitter.com/fTpf4K7rfo— Bollywood Hungama (@Bollyhungama) October 10, 2017