‘आता मी समलैंगिक व्यक्तिंचे दु:ख समजू शकतो’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 05:38 IST2016-02-26T12:38:50+5:302016-02-26T05:38:50+5:30
‘अलीगढ’ या चित्रपटातील भूमिकेने अभिनेता राजकुमार राव याचे आयुष्य बदलून टाकले आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे प्रोफेसर श्रीनिवास रामचंद्रन सीरस ...
.jpg)
‘आता मी समलैंगिक व्यक्तिंचे दु:ख समजू शकतो’
‘ लीगढ’ या चित्रपटातील भूमिकेने अभिनेता राजकुमार राव याचे आयुष्य बदलून टाकले आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे प्रोफेसर श्रीनिवास रामचंद्रन सीरस याच्या वास्तव जीवनावर आधारित हंसल मेहताच्या या चित्रपटात राजकुमारने पत्रकाराची भूमिका साकारली आहे. हा पत्रकार स्टिंग आॅपरेशन करतो आणि या स्टिंग आॅपरेशननंतर सीरस यांना त्यांच्या समलैंगिक असल्यामुळे विद्यापीठातून निलंबित केले जाते, अशी सत्यकथा यात दाखवली आहे. या चित्रपटात काम केल्यानंतर राजकुमारला समलैंगिक व्यक्तिंकडे बघण्याचा दृष्टिकोन पार बदलून गेलाय. तो म्हणतो. ‘अलीगढ’ने मला व्यक्तिश: प्रभावित केले. आता मी एखाद्याच्या लैंगिक अभिरूचीमुळे त्याच्याबाबत वाईट वा नकारात्मक मत बनवत नाही. सीरसचे आयुष्य बघितल्यानंतर समलैंगिक व्यक्तिच्या मनातील अंतर्गत संघर्ष मला जवळून जाणवला. समाज आजही समलैंगिक व्यक्तिंना मोकळ्या मनाने स्वीकारत नाही. पण मला या लोकांच्या यातना, त्यांचे दु:ख, त्यांचे मनातल्या मनात कुढणे सगळे जाणवले. ‘अलीगढ’ चित्रपटाने या वर्गाकडे निकोप मनाने बघण्याची दृष्टी मला दिली.