आता अजय देवगणसोबत दिसणार सनी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 21:28 IST2016-08-10T15:58:06+5:302016-08-10T21:28:06+5:30
सनी लिओनीचे चित्रपट बॉक्सआॅफिसवर भलेही कमाल दाखवू शकलेले नाहीत. पण हळूहळू का होईना, सनी बॉलिवूडमधील तिचे स्थान पक्के करतेयं. ...

आता अजय देवगणसोबत दिसणार सनी!
स ी लिओनीचे चित्रपट बॉक्सआॅफिसवर भलेही कमाल दाखवू शकलेले नाहीत. पण हळूहळू का होईना, सनी बॉलिवूडमधील तिचे स्थान पक्के करतेयं. होय, आता सनीकडे ए-लिस्ट चित्रपटांचे प्रस्ताव येऊ लागले आहेत. शाहरूख खान, आमीर खान यांच्यासारख्या सुपरस्टार्सलाही सनीसोबत स्क्रीन शेअर करण्यात कुठलीही अडचण नाहीयं. शाहरूखच्या ‘रईस’मध्ये सनी एका आयटम नंबरमध्ये दिसणार असल्याचे तुम्हाला ठाऊक आहेच. सोनाक्षी सिन्हाच्या ‘नूर’ या आगामी चित्रपटातही सनी कॅमिओ रोलमध्ये दिसणार असल्याची खबर आहे. एवढेच नाही तर अजय देवगणच्या ‘बादशाहो’ या आगामी चित्रपटातही सनी दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी या चित्रपटात एका स्पेशल गाण्यात दिसेल. ‘बादशाहो’चे दिग्दर्शक मिलन लुथरिया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. शिवाय सनी व अजयची जोडी प्रेक्षकांना नक्की आवडेल, असा विश्वासही बोलून दाखवला. सनी या चित्रपटात वेगळ्या आणि हटके अवतारात दिसणार असल्याचेही त्यांनी सांगितले.