रणवीर सिंगनंतर आता हा अभिनेता दिसणार पोलिसाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 20:10 IST2019-04-19T20:10:00+5:302019-04-19T20:10:00+5:30
गेल्या वर्षी रणवीर सिंगने 'सिम्बा' चित्रपटात पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत झळकला होता. त्यानंतर आता आणखीन एक अभिनेता पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

रणवीर सिंगनंतर आता हा अभिनेता दिसणार पोलिसाच्या भूमिकेत
बॉलिवूडमध्ये सध्या पोलिसांवर चित्रपट बनताना पाहायला मिळत आहेत. मागील वर्षी अभिनेता रणवीर सिंग सिम्बा चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता. तसेच आयुषमान खुरानादेखील 'आर्टिकल १५' मध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांनंतर आता अभिनेता आफताब शिवदासानी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.
बराच कालावधीपासून बॉलिवूड मधून गायब असलेला आफताब चित्रपटात झळकणार आहे. त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
आफताबने शेअर केलेल्या फोटोत आफताबने पोलिसांच्या भूमिकेत दिसत आहे. हा फोटो त्याच्या नव्या सिनेमातील आहे. या चित्रपटाचे नाव 'सेटर्स' असून या चित्रपटात तो पोलीस अधिकारी आदित्य सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी आफताबने दाढी ठेवली आहे. इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करत लिहिले की, 'एकटेपणात एक शक्ती आहे. या शक्तीला फार कमी लोक सांभाळू शकतात.'
'सेटर्स' चित्रपटाची कथा शिक्षण जगतातील माफियांवर आधारीत आहे. यात आफताब माफियांविरोधात लढताना दिसणार आहे.सेटर्समध्ये आफताबचा वेगळा अंदाज रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट ३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आफताबला पोलिसाच्या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे.
आफताब शेवटचा २०१६ साली 'ग्रेट ग्रॅण्ड मस्ती' चित्रपटात दिसला होता. हा अॅडल्ट कॉमेडी चित्रपट होता.